Esha Deol | ‘त्यांना वाटायचं आम्हीच स्टार…’, धर्मेंद्र – हेमा मालिनी यांच्याबद्दल ईशा असं का म्हणाली?

Esha Deol | धर्मेंद्र - हेमा मालिनी यांच्याबद्दल ईशा हिचं मोठं वक्तव्य, आई - वडिलांना स्टार म्हणत अभिनेत्री स्वतःला म्हणाली..., सध्या सर्वत्र ईशा देओल हिच्या वक्तव्याची चर्चा...

Esha Deol | 'त्यांना वाटायचं आम्हीच स्टार...', धर्मेंद्र - हेमा मालिनी यांच्याबद्दल ईशा असं का म्हणाली?
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 3:09 PM

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ईशा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण तर केलं पण, ईशा इंडस्ट्रीमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण करू शकली नाही. पण बॉलिवूडमधील अव्वल अभिनेत्री नसली तरी, ईशा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. दरम्यान नुकताच ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा झाली आहे. नॉन फीचर फिल्म कॅटेगरीत ईशा देओल हिच्या ‘दुआ’ या सिनेमाला पुरस्कार मिळाला आहे. सिनेमात ईशाने फक्त भूमिका बजावली नसून, सिनेमाची निर्मिती देखील अभिनेत्रीने केली आहे. ईशा देओल निर्मित पहिल्याच सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

पुरस्कार मिळाल्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आहे. सध्या सर्वत्र ईशा देओल हिची चर्चा रंगत आहेत. आपल्या मुलीच्या यशाबद्दल हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. एवढंच नाही, ईशा हिने आई – वडिलांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. वडील धर्मेंद्र यांच्या नावाचा उल्लेख करत अभिनेत्री म्हणाली, ‘मला कायम वडिलांच्या आशीर्वादाची गरज आहे…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘आपण आपल्या आयुष्यात जे काही करतो, त्यासाठी आपल्याला आई – वडिलांच्या आशीर्वादाची गरज असते. जेव्हा मी ‘दुवा’ सारख्या गंभीर विषयावर काम करते, तेव्हा दोघे पुढाकार घेत काम करण्यासाठी मला उत्सुक करतात. ‘

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझे आई – वडील दिग्गज कलाकार आहेत. त्यांना कायम वाटतं, की ते स्टार आहेत आणि त्यांची मुलं देखील याच क्षेत्रात करियर करतील तर, लोकांचं लक्ष त्यांच्यावर असेल… म्हणून ते कायम आनंदी असतात…’ सध्या सर्वत्र ईशा देओल हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगत आहेत.

ईशा देओल स्टारर, ‘दुआ’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमाची कथा गर्भपातावर आधारित आहे. सिनेमात ईशा हिने आईची भूमिका बजावली आहे. सिनेमा तुम्हाला ओटीटी प्लेटफॉर्म जियो सिनेमावर पाहता येणार आहे.

ईशा देओल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. बॉलिवूडमध्ये ईशा आता सक्रिय नसली तरी, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.