Video | पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर सनी आणि बॉबी यांच्यासोबत दिसली ईशा देओल, व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले…
सनी देओल याचा काही दिवसांपूर्वीच गदर 2 हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाका करण्यास सुरूवात केलीये. गदर चित्रपटाची ओपनिंग तर धमाकेदार ठरली आहे. सनी देओल या चित्रपटामुळे तूफान चर्चेत आहे. सनी देओल या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला होता.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सनी देओल हा त्याच्या गदर 2 (Gadar 2) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे गदर 2 चित्रपटासाठी सनी देओल याचे काैतुकही केले जात आहे. पहिल्याच दिवशी गदर 2 चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केलीये. गदर 2 चित्रपटाबद्दलची एक मोठी क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळत आहे. गदर 2 चित्रपट (Movie) अनेक रेकाॅर्ड तोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गदर 2 चित्रपटात सनी देओल हा मुख्य भूमिकेत आहे.
विशेष म्हणजे गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही सनी देओल हा दिसला. गदर 2 चित्रपट रिलीज झाल्यानंतर सनी देओल याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चाहत्यांना गदर 2 चित्रपट बघण्यास जाण्याची विनंती करताना देखील सनी देओल हा दिसला.
इतकेच नाही तर काही चुकले तर माफ करा हे या व्हिडीओमध्ये सनी देओल याने म्हटले होते. एकीकडे गदर 2 चित्रपट धमाका करत असतानाच दुसरीकडे सनी देओल त्याच्या कुटुंबासह चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये दिसला. विशेष बाब म्हणजे यावेळी सनी देओला आणि बॉबी देओल यांच्यासोबत त्यांची सावत्र बहीण ईशा देओल देखील दिसली.
याचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. या तिघा बहीण भावांना एकसोबत पाहून चाहत्यांना मोठा आनंद झाल्याचे दिसत आहे. गदर 2 मुळे का होईना परंतू तिघे भाऊ बहीण एका फोटोमध्ये पोझ देताना दिसले. काही दिवसांपूर्वीच सनी देओलच्या मुलाचे लग्न झाले. त्या लग्नामध्येही कुठेच ईशा देओल आणि हेमा मालिनी या दिसल्या नव्हत्या.
विशेष म्हणजे धर्मेंद्र यांनी कॅमेऱ्यासमोर पोझ देत असलेल्या ईशा देओल, सनी देओला आणि बॉबी देओल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये चक्क सनी देओल आणि बॉबी देओल हे बहीण ईशा देओल हिला गळ्याला लावताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये ईशा देओल देखील आनंदी दिसत आहे.
या व्हिडीओवर कमेंट करत एकाने म्हटले की, मी तर यांना पहिल्यांदाच असे एकसोबत बघत आहे. दुसऱ्याने लिहिले की, असेच आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहा. तिसऱ्याने लिहिले की, खरोखरच हे तिघे एकसोबत आल्यावर छान वाटतात. या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.