Esha Gupta वर दुःखाचा डोंगर; गमावला कुटुंबातील खास सदस्य
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ईशा गुप्तावर कोसळला दुःखाचा डोंगर; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मैं तेनू फिर मिलांगी'
Esha Gupta : अभिनेत्री ईशा गुप्ताने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे; पण अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत ‘आश्रम’ सीरिजच्या माध्यमातून वाढ झाली. झगमगत्या विश्वातील प्रचंड ग्लॅमरस आणि फिट अभिनेत्री म्हणून अभिनेत्रीची ओळख आहे. एकीकडे प्रत्येक जण नव्या वर्षाचा उत्साह साजरा करत आहे, तर दुसरीकडे ईशावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील खास व्यक्तीने अखेरचा श्वास घेतल्यामुळे अभिनेत्री दुःखी आहे. खुद्द ईशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत भावना शेअर केल्या आहेत.
ईशाच्या कुटुंबातील पाळीव प्राण्याने जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत अभिनेत्री दुःख व्यक्त केलं आहे. ईशाने श्वानासोबत काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘मैं तेनू फिर मिलांगी’ असं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या आयुष्यातील खास सदस्याने ३१ डिसेंबर २०२२ साली अखेरचा श्वास घेतला.
View this post on Instagram
ईशा अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी प्राण्यांवर प्रचंड प्रेम करते. ईशाच्या इन्स्टाग्रामवर पाळीव प्राण्यांसोबत अनेक फोटो आहेत. ईशाने वाईट बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीचं समर्थन केलं. सध्या ईशाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ईशाच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘जन्नत 2’, ‘बादशाहों’, ‘कमांडो 2’, ‘रुस्तम’ आणि ‘टोटल धमाल’ या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. ‘आश्रम ३’ सीरिजमध्ये अभिनेत्रीने सोनिया या भूमिकेला न्याय दिला. ‘आश्रम’ सीरिजच्या प्रत्येक भागाला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं.
ईशाबद्दल सांगायचं झालं, तर सोशल मीडियावर देखील ईशा कायम सक्रिय असते. स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. सोशल मीडियावर ईशाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करतात.