Bollywood | अभिनेत्याची होती सर्वत्र दहशत; त्यांना पाहताच पुरुष लपवायचे स्वतःच्या पत्नीचा चेहरा, कारण..

Bollywood | 'औरतों को छुपाओ, औरतों को छुपाओ', 'या' प्रसिद्ध अभिनेत्याबद्दल लोकांच्या मनात होती भीती, त्यांना पाहताच पुरुष लपवायचे पत्नीचा चेहरा, त्यानंतर..., सध्या सर्वत्र अभिनेत्याने चर्चा... अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका बजावत अभिनेत्याने केलं प्रेक्षकांचं मनोरंजन, पण बाहेर आल्यानंतर मात्र...

Bollywood | अभिनेत्याची होती सर्वत्र दहशत; त्यांना पाहताच पुरुष लपवायचे स्वतःच्या पत्नीचा चेहरा, कारण..
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 9:35 AM

मुंबई : 23 सप्टेंबर 2023 | झगमगत्या विश्वात असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांना लोकं फक्त आणि फक्त त्यांनी बजावलेल्या भूमिकांमुळे ओळखतात. अभिनेत्यांची ओळख त्यांनी मोठ्या पडद्यावर साकारलेल्या भूमिकांमुळे तयार झाली, पण काही अभिनेत्यांच्या खासगी आयुष्यावर देखील सिनेमांमध्ये बजावलेल्या भूमिकांमुळे अनेक परिणाम झाले. आता सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगत आहे, ते अभिनेते दुसरे तिसरे कोणी नसून अभिनेते प्रेम चोप्रा आहेत… प्रेम चोप्रा यांनी अनेक सिनेमांमध्ये खलनायकाच्या भूमिकेला न्याय दिला. ज्यामुळे खऱ्या आयुष्यात देखील लोक त्यांना विलन समजू लागले. रिल आयुष्याचा त्यांच्या रिलय आयुष्यावर परिणाम होत होता.. आज प्रेम चोप्रा ८८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल एक खास गोष्ट जाणून घेवू….

स्वतःच्या खासगी आयु्ष्याबद्दल प्रेम चोप्रा यांनी अनेक मुलाखतींमध्ये अनेक खुलासे केले. सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी प्रेम चोप्रा यांच्या पत्नीने त्यांना प्रोत्साहन दिलं. पण एक दिवस असा आला जेव्हा मुलाने साकारलेल्या भूमिकांमुळे प्रेम चोप्रा यांचे वडील हैराण झाले होते. काही लोकांना भेटल्यानंतर त्यांच्यासमोर घडलेल्या एका घटनेमुळे प्रेम चोप्रा यांच्या वडिलांनी तेथून काढता पाय घेतला.

मुलाखतीत प्रेम चोप्रा यांनी एक घडलेली घटना सांगितली. वडिलांना भेटण्यासाठी प्रेम चोप्रा चंदीगड याठिकाणी गेले होते. चंदिगडमध्ये पंचकुला गार्डन आहे. गार्डनमध्ये प्रेमचोप्रा वडिलांसोबत फिरायला गेले होते. त्यादरम्यान काही लोकांनी त्याला पाहिले आणि त्याच्या दिशेने जाऊ लागले.

गार्डनमध्ये आलेले प्रेम चोप्रा आहेत हे लोकांना कळलं…तेव्हा लोकांमध्ये आरडा ओरडा सुरु झाला. ‘औरतों को छुपाओ, औरतों को छुपाओ… प्रेम चोप्रा आ रहे है,’ असं लोक म्हणू लागले. तेव्हा प्रेम चोप्रा यांच्या वडील हैराण झाले. पण तेव्हा प्रेम चोप्रा यांनी लोकांची समज घातली. खऱ्या आयुष्यात मी खलनायक नाही… असं प्रेम चोप्रा लोकांना म्हणाले.

प्रेम चोप्रा यांच्या म्हणण्यानुसार, काही सिनेमांमध्ये त्यांनी बलात्काराचे काही सीन दिले आहेत. ‘लाट साहब’, ‘झील के उस पार’ सिनेमांमुळे प्रेम चोप्रा चर्चेत आले. तर सिनेमात सीनची गरज असल्यामुळे त्यांनी सीन दिल्याचं देखील म्हटलं. प्रेम चोप्रा यांनी जवळपास २० पेक्षा देखील जास्त सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.