Bollywood | ‘इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक जण फ्लर्ट करताना…’, झगमगत्या विश्वातील पुरुषांबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली

Bollywood | अभिनेता उदय चोप्रा याच्यासोबत होते अभिनेत्रीचे प्रेमसंबंध; इंडस्ट्रीमधील नात्यांबद्दल अभिनेत्रीचं स्पष्ट वक्तव्य... पुरुषांच्या स्वभावाबद्दल देखील अभिनेत्रीने वक्तव्य केलं आहे... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा...

Bollywood | 'इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक जण फ्लर्ट करताना...', झगमगत्या विश्वातील पुरुषांबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 3:55 PM

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वात काही अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी करियरच्या सुरुवातील अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत लग्न केलं. पण काही वर्षांनंतर अभिनेत्री अचानक गायब झाल्या. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री नर्गिस फखरी (Nargis Fakhri)… नर्गिस हिने अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत ‘रॉकस्टार’ (Rockstar) सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली. ‘रॉकस्टार’ सिनेमानंतर देखील अभिनेत्री अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. पण अभिनेत्री चाहत्यांच्या मनावर राज्य करू शकली नाही. आता अभिनेत्रीने झगमगत्या विश्वातील पुरुषांबद्दल मोठी गोष्टी सांगितलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीला रिलेशनशिपबद्दल विचारण्यात आलं. कोणत्या भारतीय सेलिब्रिटीकडून तुला रिलेशनशिपचे सल्ले घ्यायला आवडेल? या प्रश्नाचं उत्तर देत नर्गिस म्हणाली, ‘तुम्ही मला सांगा कोणत्या सेलिब्रिटीचं रिलेशनशिप चांगलं आहे. कोणाच्या नात्यामध्ये सर्वांत जास्त प्रेम आहे… तुम्हीच मला सांगा… इंडस्ट्रीमध्ये फक्त नात्याचा देखावा असतो..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी प्रामाणिकपणे सांगेल कोणाकडूनही रिलेशनशिपसाठी सल्ले घेणार नाही.. मला तुम्हाला सांगायला आवडेल याठिकाणी सर्व काही खूप वेगळं आहे. काहीही सत्य नाही. अनेक जण त्यांच्या नात्यातील वाईट गोष्टी लपवत असतात. प्रत्येक जण फक्त परफेक्ट दिसण्याचा प्रयत्न करत असतो.’

हे सुद्धा वाचा

रिलेशनशिपबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या नात्याचा मी स्वतःविचार करेल. थेरेपिस्टची मदत घेईल. पण इंडस्ट्रीमधील लोकांकडून सल्ला घेणार नाही.’ मुलाखती दरम्यान, अभिनेत्रीने फ्लर्टिंगबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नर्गिस हिची चर्चा रंगली आहे.

‘इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक जण एकमेकांसोबत फ्लर्ट करत असतो. मला असं वाटतं फ्लर्ट करणं पुरुषांच्या स्वभावात असतं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. नर्गिस हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, एक वेळ अशी होती जेव्हा नर्गिस आणि उदय चोप्रा यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

नर्गिस फाखरी हिचे सिनेमे

रॉकस्टार सिनेमा शिवाय नर्गिस हिने मद्रास कॅफे, फाटा पोस्टर निकला हिरो, मैं तेरा हीरो, किक आणि हाउसफुल 3 यांसारख्या सिनेमांध्ये काम केले आहेत. सध्या अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.