Video | उर्फी जावेद हिचा लूक पाहून नेटकरीही थक्क, चक्क ‘या’ वस्तूने झाकले अंग, व्हिडीओ तूफान व्हायरल
उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेद हिला अनेकदा थेट तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जातात. मात्र, या धमक्यांना उर्फी जावेद अजिबातच घाबरत नाही.
मुंबई : उर्फी जावेद हे कायच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख नक्कीच मिळवली आहे. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. उर्फी जावेद हिने काही वर्षांपूर्वीच आपले अभिनेत्री होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई (Mumbai) गाठली. मात्र, सुरूवातीच्या काळात उर्फी जावेद हिला अत्यंत मोठा संघर्ष करावा लागला. उर्फी जावेद हिला काम मिळत नव्हते. चक्क उर्फी जावेद हिला मुंबईच्या रस्त्यावर झोपण्याची वेळ आली.
उर्फी जावेद हिने जरी अनेक टीव्ही मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या असतील. मात्र, उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीपासूनच मिळालीय. बिग बाॅस ओटीटीमध्ये धमाकेदार गेम खेळताना उर्फी जावेद ही दिसली. नुकताच पार पडलेल्या बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये घरातील सदस्यांना भेटण्यासाठी उर्फी जावेद ही गेली होती.
उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी स्टाईलमुळे कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ लगेच व्हायरल होताना दिसतात. मात्र, अनेकांना उर्फी जावेद हिची स्टाईल अजिबातच आवडत नाही.
नुकताच उर्फी जावेद हिने एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. इतकेच नाही तर उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी देखील डोक्याला हात लावलाय. उर्फी जावेद हिचा आता हा नवा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
View this post on Instagram
उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने चक्क लहान मुलांच्या खेळण्याच्या छोट्या छोट्या गाड्यांनी आपले शरीर झाकले आहे. या व्हिडीओमध्ये सुरूवातीला उर्फी जावेद ही लहान मुलांची गाडी खेळताना देखील दिसत आहे. लहान मुलांच्या गाड्यांनी तिने चक्क ब्रालेट तयार केले आहे. आता या व्हिडीओवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
उर्फी जावेद या व्हिडीओमध्ये बोल्ड देखील दिसत आहे. उर्फी जावेद ही कायमच आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना देखील दिसते. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, उर्फी जावेद हिच्याकडे या सर्व कल्पना नेमक्या कुठून येतात, हेच मला कळत नाही. दुसऱ्याने लिहिले की, चक्क गाड्यांनी यावेळी हिने स्वत: चे अंग झाकले आहे.