मलायका अरोरा हिच्यासोबत अरबाज खान याने साजरा केला वाढदिवस? ते फोटो व्हायरल, दुसरी पत्नी शूरा खान…
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही मलायका दिसते.
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही दिसते. मलायका अरोरा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर तिने अर्जुन कपूर याला डेट करण्यास सुरूवात केली. आता चर्चा आहे की, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाले. तशा काही पोस्टही सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची चर्चा असतानाच काही दिवसांपूर्वीच अरबाज खान याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. अरबाज खान आणि शूरा खान यांच्या लग्नाला अत्यंत जवळचे लोक उपस्थित होते. या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. विशेष म्हणजे वडिलांच्या लग्नात मलायकाचा लेक अरबाज खान हा धमाल करताना दिसला.
4 ऑगस्ट रोजी अरबाज खान याचा 57 वा वाढदिवस पार पडलाय. विशेष म्हणजे शूरा खान हिच्यासोबतच्या लग्नानंतरचा अरबाज खान याचा हा पहिल्याच वाढदिवस होता. शूरा खान हिने अरबाजच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. हेच नाही तर शूरा खान, अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी एकत्रच वाढदिवस साजरा केल्याची चर्चा आहे.
शूरा खान आणि अरबाज खान हे वाढदिवस साजरा करण्यासाठी विदेशात गेले. मुंबई एअरपोर्टवर शूरा खान आणि अरबाज खान स्पॉट झाले. विशेष म्हणजे शूरा खान आणि अरबाज खान हे एअरपोर्टमध्ये गेले त्यानंतर लगेचच एअरपोर्टवर मलायका अरोरा देखील पोहोचली. मलायका अरोरा अत्यंत घाई घाईमध्ये एअरपोर्टमध्ये जाताना दिसली.
शूरा खान आणि अरबाजने फोटोसाठी पोज दिली. मात्र, मलायका अरोरा ही फोटोसाठी पोज न देताच निघून गेली. शूरा खान, अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी एकत्रच वाढदिवस साजरा केल्याचे सातत्याने सांगितले जातंय. मात्र, याबद्दल तसा खुलासा हा होऊ शकला नाहीये. अर्जुन कपूर याच्यासोबत ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्यापासून मलायका अरोरा ही सतत विदेशात जाताना दिसत आहे.