Rocky Aur Rani Ki Prem Kahaani | चित्रपटाच्या सेटवर आलिया भट्ट आणि रणवीर सिंहची धमाल, करण जोहरही दिसली खास स्टाईलमध्ये
आलिया भट्ट आणि रणवीर सिंह हे त्यांच्या आगामी रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे एक गाणे कश्मीर येथे शूट करण्यात आले आहे.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे त्यांच्या आगामी रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. रॉकी और रानी की प्रेम कहानी हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट (Movie) आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे शूटिंग कश्मीरमध्ये करण्यात आले. एक मुलाखतीमध्ये रणबीर कपूर म्हणाला होता की, आलिया ही रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahaani) चित्रपटाच्या शूटिंगसाठी कश्मीरला गेली असून ती मुंबईमध्ये नाहीये. विशेष म्हणजे आलिया हिच्यासोबत मुलगी राहा ही देखील गेलीये आणि मी या दोघींनाही खूप जास्त मिस करत आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल सात वर्षांनंतर करण जोहर हा निर्देशकाच्या भूमिकेत दिसणार आहे. शक्यतो करण जोहर याचे चित्रपट रोमान्सचे असतात. 28 जुलै 2023 रोजी रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन हे आतापासूनच केले जात आहे.
नुकताच रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो आणि व्हिडीओ हे तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटो आणि व्हिडीओमध्ये करण जोहर, रणवीर सिंह आणि आलिया भट्ट धमाल करताना दिसत आहेत. म्हणजेच रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाच्या सेटवर चित्रपटाच्या टिमने धमाल केलीये.
गेल्या काही दिवसांपासून सतत रणवीर सिंह याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंह यांचा सर्कस हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. रोहित शेट्टी याला या चित्रपटाकडून नक्कीच मोठ्या अपेक्षा होत्या.
विशेष म्हणजे सर्कस चित्रपटाची संपूर्ण टिम जोरदार प्रमोशन करताना दिसली होती. तरीही चित्रपट फ्लाॅप गेला. दुसरीकडे आलिया भट्ट हिचे चित्रपट चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. आता आलिया आणि रणवीर यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. करण जोहर हा नेहमीच नेपोटिझमच्या विषयावरून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतो.