सैफसमोर शाहिद – करीनाची Awkward मूमेंट, मग जे घडलं, त्याचा Video Viral

'ओमकारा' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीनाने सैफ अली खानसमोरच शाहिदला किस केल्याचं म्हटलं जातं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. शाहिदने 2015 मध्ये मीरा राजपूतशी लग्न केलं.

सैफसमोर शाहिद – करीनाची Awkward मूमेंट, मग जे घडलं, त्याचा Video Viral
Shahid Kapoor, Kareena Kapoor and Saif Ali KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 9:46 AM

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीत असे बरेच सेलिब्रिटी आहेत, जे एकेकाळी एकमेकांना डेट करायचे. रिलेशपशिपमध्ये असताना त्यांनी सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. मात्र ब्रेकअपनंतर त्यांनी कधी एकमेकांचं तोंडही पाहिलं नाही. पण हेच कपल जेव्हा सार्वजनिक ठिकाणी अचानक एकमेकांसमोर येतात, तेव्हा तो किस्सा चांगलाच गाजतो. असाच काहीसा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शाहिद कपूर आणि करीना कपूर यांचा आहे. ब्रेकअपनंतर करीना आणि शाहिद जेव्हा एका पुरस्कार सोहळ्यात एकमेकांसमोर आले, तेव्हा सैफ अली खानसुद्धा तिथे उपस्थित होता. रेडिटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

शाहिद कपूर आणि फरहान अख्तर हे आयफा अवॉर्ड्सचं सूत्रसंचालन करत असतात. यादरम्यान पुरस्कार देण्यासाठी शाहिद कपूर हा करीना आणि सैफला मंचावर बोलावतो. यावेळी उपस्थित प्रेक्षक त्यांच्याकडेच बघू लागतात. विशेष म्हणजे यावेळी शाहिद आणि करीना एकमेकांशी संवादसुद्धा साधतात. करीना शाहिदला आणि फरहानला धन्यवाद म्हणते. मात्र यावेळी शाहिद तिच्याकडे अजिबात वळून बघत नाही. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

बॉलिवूड इंडस्ट्रीत एकेकाळी शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या लव्हस्टोरीची जोरदार चर्चा होती. हे दोघं जवळपास तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 2004 मध्ये ‘फिदा’ या चित्रपटाच्या सेटवर करीना शाहिदला पहिल्यांदा भेटली होती. पहिल्याच भेटीत तिला शाहिद आवडला होता. या भेटीनंतर लगेचच दोघं एकमेकांना डेट करू लागले होते. खुद्द करीनाने एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की तिने शाहिदला अनेकदा मेसेज आणि फोन केले होते. त्यानंतर त्याने तिच्या प्रपोजलचा स्वीकार केला होता.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

Awkward interaction between Shahid and Kareena. by u/sepiosexual in BollyBlindsNGossip

‘ओमकारा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीनाने सैफ अली खानसमोरच शाहिदला किस केल्याचं म्हटलं जातं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. शाहिदने 2015 मध्ये मीरा राजपूतशी लग्न केलं. मीरा ही शाहिदपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे. लग्नाच्या वेळी ती 21 वर्षांची होती. या दोघांना दोन मुलं आहेत.

दुसरीकडे करीनाने सैफ अली खानसोबत लग्न केलं. या दोघांनाही दोन मुलं आहेत. शाहिद आणि मीराचं अरेंज मॅरेज होतं. तर सैफ आणि करीनाने लव्ह – मॅरेज केलं.

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.