AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fact Check: ‘त्या’ फोटोत शाहरुखची बायको नाही? मग ती कोण? ‘आयडीया ऑफ इंडियाच्या’? फोटोचं वास्तव काय?

यात तो दुवा मागतोय तर त्याच्यासोबत पांढऱ्या सदऱ्यात एक महिला आहे जी त्याची बायको गौरी खान म्हणून व्हायरल झालीय. ती मात्र हिंदू धर्माप्रमाणे हात जोडून अंत्यदर्शन घेतेय. लोकांनी हा फोटो 'आयडीया ऑफ इंडिया' म्हणून प्रसारीत केलाय. पण हे मात्र त्या फोटोचं वास्तव नाही. 

Fact Check: 'त्या' फोटोत शाहरुखची बायको नाही? मग ती कोण? 'आयडीया ऑफ इंडियाच्या'? फोटोचं वास्तव काय?
हाच तो फोटो ज्यात शाहरुख आणि त्याची मॅनेजर पुजा ददलानी अंत्य दर्शन घेतायत.
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 8:21 AM

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) ह्या आता अनंताच्या प्रवासाला गेलेल्या आहेत पण त्यांच्या अंत्यविधीत जे काही पहायला मिळालं त्यावर सोशल मीडियावर चांगलंच वादळ उठलेलं दिसतंय. विशेषत: शाहरुख खान. (Shahrukh Khan) कारण किंग खान अंत्यविधीसाठी शिवाजी पार्कवर आला. अर्थातच व्हिआयपींसोबत बसला. पवार, मुख्यमंत्री, पीयुष गोयल यांच्यासोबतही त्यानं हितगुज केलं. नंतर त्यानं लता दिदींचं अंत्यदर्शन घेतलं. त्यावेळेस जो काही प्रसंग घडला त्यानं वाद विवाद होतोय सोबतच त्याचं कौतूकही केलं जातंय. शाहरुखनं आधी दुवा पढली नंतर हात जोडून दिदींचं अंत्यदर्शन घेतलं. त्यावेळेस त्यानं इस्लाम धर्माच्या  प्रथेनुसार फुंकरही घातली. त्यावरुन वाद झडतोय. पण आपण त्या वादात न पडता, ज्याच्यासाठी शाहरुखचं देशभर कौतूक होतंय त्यावर लक्ष केंद्रीत करणार आहोत. शाहरुखचा एक फोटो व्हायरल होतोय. यात तो दुवा मागतोय तर त्याच्यासोबत पांढऱ्या सदऱ्यात एक महिला आहे जी त्याची बायको गौरी खान (Gauri Khan) म्हणून व्हायरल झालीय. ती मात्र हिंदू धर्माप्रमाणे हात जोडून अंत्यदर्शन घेतेय. लोकांनी हा फोटो ‘आयडीया ऑफ इंडिया’ म्हणून प्रसारीत केलाय. पण हे मात्र त्या फोटोचं वास्तव नाही.

असे अनेक ट्विट व्हायल झाले आहेत-

हे आणखी एक ट्विट पहा

फोटोतली ती कोण?

सोशल मीडियावर कालपासून एक फोटो फिरतोय. ह्या फोटोत शाहरुख खान आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी गौरी खान हे लता मंगेशकर यांचं अंत्य दर्शन घेत असल्याचं दाखवलं गेलंय. हा फोटो प्रचंड व्हायरल झालाय. त्याला कारण आहे ते अंत्यदर्शन घेताना दोघांनी पाळलेला आपआपला धर्म. शाहरुख दुवा करतोय तर गौरी खान हात जोडून दर्शन घेतल्याचं फोटोत दिसतंय. अनेकांनी माझी ही आयडीआय ऑफ इंडिया असल्याचं फोटो शेअर करताना म्हटलय. म्हणजेच आम्हाला आमचा भारत कसा हवा तर तो ह्या फोटोतल्यासारखा. जिथं नवरा बायको वेगवेगळ्या धर्माचे असले तरी आप आपल्या धर्माचं पालन करण्याची त्यांना मुभा असेल. यात खास करुन शाहरुखचं जास्त कौतूक होतंय कारण त्यानं स्वतच्या पत्नीवर धर्म लादलं नसल्याचं ह्या फोटोतून दावा केला जातोय. पण बहुतांश जणांनी हा फोटो शेअर करताना खातरजमा केलेली नाही की, फोटोत दिसणारी ती महिला त्याची बायको गौरी खानच आहे की नाही? कारण आमच्या पडताळणीत ती शाहरुख खानची पत्नी गौरी खान नसून त्याची मॅनेजर पुजा ददलानी आहे. पण बहुतांश जणांनी शाहरुख आणि पुजा ददलानीचा फोटो हा नवरा बायकोचा फोटो म्हणून व्हायरल केलाय.

पुजा ददलानी शाहरुखची मॅनेजर असून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आली होती. फोटो-गुगल

कोण आहे पुजा ददलानी?

पुजा ददलानी ही शाहरुख खानची मॅनेजर आहे. तिच्या सोशलच्या प्रोफाईलनुसार ती टॅलेंट मॅनेजर आहे. फक्त शाहरुखच नाही तर ती त्याची पत्नी गौरी खानचीही खास असल्याचं सोशलवरच्या फोटोवरुन दिसतं. विशेष म्हणजे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खान मुलाच्या भेटीसाठी कुठेही समोर आलेला नव्हता. पण पोलीस स्टेशन ते कोर्ट कचेऱ्यांपर्यंत सगळीकडे त्याची मॅनेजर म्हणून पुजा ददलानीच धावपळ करताना दिसत होती. त्याच वेळेस ती पहिल्यांदा चर्चेत आली होती. ह्याच प्रकरणात पुजावर काही गंभीर आरोपही केले गेलेत. तिच पुजा ददलानी काल शाहरुख खानसोबत लता दिदींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेताना सोबत होती. दोघांची फोटो शाहरुख-गौरी खान म्हणून प्रसिद्ध झालाय.

शाहरुख आणि गौरी खानसोबत पुजा ददलानी- फोटो-पुजा इन्स्टाग्राम

हाच तो शाहरुखचा व्हिडीओ ज्यात तो फुंकर घालतोय, थुंकत नाहीय. सोबत पुजा ददलानी आहे, शाहरुखची बायको गौरी खान नाही.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.