Swara Bhasker | फहाद अहमदने पत्नी स्वरा भास्करला म्हटलं ‘भाई’; नेटकऱ्यांचा चढला पारा!

स्वरा बेधडकपणे तिची मतं मांडण्यासाठी ओळखली जाते. त्याचसोबत ती विविध आंदोलनांमध्येही सहभागी होते. अशाच एका आंदोलनात तिची फहादशी पहिली भेट झाली. स्वराने तिच्या लग्नाविषयीची माहिती देताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता.

Swara Bhasker | फहाद अहमदने पत्नी स्वरा भास्करला म्हटलं 'भाई'; नेटकऱ्यांचा चढला पारा!
Swara Bhasker and Fahad AhmadImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 9:21 AM

नवी दिल्ली : अभिनेत्री स्वरा भास्करने जेव्हा तिचं लग्न जाहीर केलं, तेव्हापासून ती सतत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. मात्र ट्रोलिंगला न जुमानता स्वराने पती फहाद अहमदसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. नुकताच स्वराने लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त फहादने स्वरासोबतचा फोटो पोस्ट करत आपल्या खास अंदाजात तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र फहादच्या या पोस्टमधील एका शब्दाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आणि त्यावरूनच टीका करण्यास सुरुवात झाली आहे.

स्वराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना फहादने तिच्यासोबतचा फोटो पोस्ट केला. मात्र या पोस्टमध्ये त्याने स्वराचा उल्लेख ‘भाई’ असा केला. ‘भाई जेंडर न्यूट्रल आहे’ असं त्याने पोस्टच्या अखेरीस स्पष्ट केलं. फहादने शेअर केलेल्या फोटोमध्ये स्वरा भास्कर हसताना आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शेजारी बसलेली पहायला मिळत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये फहादने लिहिलं, ‘या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा भाई, माझ्या वाढदिवशी तुझे सल्ले ऐकून मी लग्न केलं. तुला ट्विटरवरून कळलंच असेल अशी आशा आहे. प्रत्येक बाबतीत मला पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. तुझ्यासारखा मित्र आणि मार्गदर्शक मिळाल्याबद्दल मी खूप खुश आहे.’ फहादच्या या पोस्टमधील भाई शब्दांवरून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

लग्नापूर्वी काही वर्षांआधी स्वरा भास्करनेही एका पोस्टमध्ये फहादला भाई म्हटलं होतं. त्यामुळे दोघं एकमेकांना भाई का म्हणत आहेत, असाही प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. ‘दोघं एकमेकांना भाई म्हणतायत, दोघांनी लग्न केलंय, अशी कृपा देवच करू शकतो’, असं एकाने लिहिलंय. तर ‘इथे भाई कोण आहे’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने आश्चर्य व्यक्त केलं आहे. ‘भाई या शब्दाचा अर्थ तरी माहितीये का? पत्नीला भाई म्हणणं हे अत्यंत मूर्खपणाचं आहे’, असंही नेटकऱ्याने म्हटलंय.

पहा ट्विट

स्वरा बेधडकपणे तिची मतं मांडण्यासाठी ओळखली जाते. त्याचसोबत ती विविध आंदोलनांमध्येही सहभागी होते. अशाच एका आंदोलनात तिची फहादशी पहिली भेट झाली. स्वराने तिच्या लग्नाविषयीची माहिती देताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये स्वराने तिची लव्ह-स्टोरी उलगडून सांगितली होती.

स्वराने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये 2019 आणि 2020 मधील आंदोलनांची झलक पहायला मिळाली. या आंदोलनातच दोघांच्या कहाणीची सुरुवात झाली होती. या दोघांचा पहिला सेल्फीसुद्धा आंदोलनातीलच आहे. त्यानंतर हळूहळू दोघांचा संपर्क वाढला. मार्च 2020 मध्ये फहादने स्वराला त्याच्या भावाच्या लग्नाचंही आमंत्रण दिलं होतं. मात्र शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे ती लग्नाला जाऊ शकली नव्हती.

या व्हिडीओत पुढे दाखवलं गेलं की गालिब नावाच्या मांजरीमुळे या दोघांमधील नातं अधिक दृढ झालं. हळूहळू व्हिडीओ कॉलवर दोघं एकमेकांशी बोलू लागले आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 6 जानेवारी रोजी दोघांनी कोर्ट मॅरेजसाठी कागदपत्रं जमा केली. व्हिडीओमध्ये दोघं कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दिसत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.