दहा वर्ष मोठी आणि दोन लेकरांच्या आईला डेट करतोय ‘हा’ अभिनेता?, अखेर त्याने नात्याबद्दल…
श्वेता तिवारी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. श्वेता तिवारीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. श्वेता तिवारी हिने काही दिवसांपूर्वीच अत्यंत मोठा खुलासा केला. श्वेता तिवारी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
श्वेता तिवारी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. श्वेता तिवारीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हेच नाहीतर श्वेता तिवारी ही तिच्या कामापेक्षा अधिक तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. श्वेता तिवारी हिच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये श्वेता तिवारी हिने सांगितले की, ती सध्या कोणत्याही मालिकेत काम का करत नाहीये. मालिकेत किंवा शोमध्ये जरी सध्या श्वेता तिवारी दिसत नसली तरीही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
श्वेता तिवारी ही दहा वर्ष छोट्या एका अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा सतत रंगताना दिसत आहे. हेच नाहीतर यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाली. आता यावरच बोलताना तो अभिनेता दिलाय. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणीही नसून फहमान खान आहे. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये फहमान खान हा त्याच्या आणि श्वेताच्या रिलेशनवर बोलताना दिसला.
फहमान खान हा म्हणाला की, हे अजिबातच सत्य नाहीये. मी त्यांना गुरूजी आणि सखी बोलवत होतो. शोच्या वेळी श्वेता तिची प्रत्येक गोष्ट मला सांगत असत. आमचा बॉन्ड खूप जास्त चांगला होता. मी त्यांना त्यांच्या बिल्डींगच्या खाली भेटलो होतो. कोरोनाच्या वेळी असे म्हटले जायचे की, त्यावेळी कोणी भेटले की नक्की समोरच्या व्यक्तीसोबत काहीतरी घडणार.
मी आणि श्वेताने कोणत्याच गोष्टीची अजिबात काळजी केली नाही. मुळात म्हणजे माझे खासगी आयुष्य खूप जास्त प्रायव्हेट आहे. तिथे हे सर्व करून मी ते खराब करत नाही. मला वाटते की, जर कामाच्या ठिकाणी एखादे रिलेशन तयार झाले की, त्याचा परिणाम आपल्या कामावर होतो. ही एक अशी गोष्ट आहे, जी तुम्ही तिथे लपवू देखील शकत नाहीत.
ते कोणत्याही प्रकारे तुमच्या कामावर परिणाम करते. फहमान खान हा म्हणाला की, मुळात म्हणजे ज्यावेळी आमच्या रिलेशनबद्दल चर्चा सुरू होती, त्यावेळी तिच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून दोन लेकरांची आई असलेली श्वेता तिवारी ही फहमान खान याला डेट करत असल्याची चर्चा आहे. श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हिने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.