फेअरप्ले ॲप प्रकरण, ईडीकडून 4 कोटींची मालमत्ता जप्त, मुंबई, गुजरातमधील 8 ठिकाणी छापे
Fairplay Satta Matka App Case: फेअरप्ले ॲप प्रकरणी प्रशासन ॲक्शन मोडवर, मुंबई, गुजरातमधील आठ ठिकाणी छापे... तब्बल 4 कोटींची मालमत्ता जप्त... अनेक सेलिब्रिटींची करण्यात आली आहे चौकशी...
Fairplay Satta Matka App Case: फेअरप्ले ॲप प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. फेअरप्ले ॲप प्रकरणी ईडीकडून मुंबई, गुजरातमधील आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. या कारवाईत जवळपास 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. फेअरप्ले बेटिंग ॲप प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मुंबई आआणि गुजरातमधील आठ ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत रोख रक्कम, बँकेतील पैसे, चांदी अशी चार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
रिपोर्टनुसार, याप्रकरणी आतापर्यंत 117 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने स्वामित्त्व हक्क भंग केल्याप्रकरणी 2023 मध्ये फेअरप्ले ॲपसह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यांच्या आधारे ईडी याप्रकरणी तपास करत आहे.
याप्रकरणी मुंबईसह गुजरातमधील आठ ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. यापूर्वी याप्रकरणी तक्रारदार ‘वायकॉम 18 नेटवर्क” कंपनीकडे इंडियन प्रीमियर लीग (आपीएल) सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क होते. पण फेअरप्ले नावाच्या ॲपवर बेकायदेशिररित्या सामन्यांचे प्रसारण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्या ॲपसाठी 40 सेलिब्रिटींनी जाहिरात केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने ऑक्टोबर, 2023 मध्ये रॅपर बादशाहची चौकशी केली होती. या संपूर्ण गैरव्यवहारामुळे तक्रारदार कंपनीचे 100 कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अभिनेत्री तमन्ना भाटिया हिची चौकशी
फेअर प्लेवर आयपीएल सामन्यांचा प्रचार केल्याप्रकरणी ईडीकडून तमन्नाची देखील चौकशी करण्यात आली. कारण अभिनेत्रीने ॲपला प्रमोट केलं आहे. सांगायचं झालं तर, याप्रकरणी तमन्ना आरोपी नसल्याचं मानलं जात आहे. अभिनेत्रीने ॲपला प्रमोट का केलं? यामागचं कारण विचारण्यासाठी तमन्ना हिची चौकशी करण्यात आली. याप्रकरणी अनेक सेलिब्रिटींची नावे देखील समोर आली आहे.