Faisal Khan: आमिर खानला सख्ख्या भावानेच म्हटलं ‘संधीसाधू’; काय आहे वाद?

"जेव्हा चूक झाली तेव्हाच माफी मागायला पाहिजे"; धाकट्या भावाचा आमिरला टोला

Faisal Khan: आमिर खानला सख्ख्या भावानेच म्हटलं 'संधीसाधू'; काय आहे वाद?
Faisal And AamirImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 3:54 PM

आमिर खानच्या (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटाला बराच विरोध सहन करावा लागला होता. आमिरच्या एका जुन्या वक्तव्यावरुन त्याच्या चित्रपटाला ‘बॉयकॉट’ करण्याची मागणी केली जात होती. सोशल मीडियावरील या नकारात्मक प्रतिक्रियांचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवरही झाला. आमिरचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेंड सुरू झाल्याच्या काही काळानंतर आमिरने लोकांची माफी मागितली. त्याच्या माफिनाम्यावर आता धाकटा भाऊ फैजल खानने (Faisal Khan) प्रतिक्रिया दिली आहे.

फैजलने आमिरला संधीसाधू म्हटलं आहे. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत फैजल म्हणाला, “होय, त्याचं माफी मागणं योग्यच होतं. माफी मागून स्वतःला सुधारण्यात काहीच गैर नाही. त्यानंतर तुम्ही एक चांगली व्यक्ती बनता. मात्र आमिरने ही गोष्ट उघडकीस आल्यानंतर लगेचच माफी मागायला हवी होती, त्याचा चित्रपट रिलीज होत असताना नाही. यामुळे तो संधीसाधू असल्यासारखं वाटतं.”

जेव्हा फैजलला विचारण्यात आलं की त्याने लाल सिंग चड्ढा हा चित्रपट पाहिला का, तेव्हा तो म्हणाला, “हो, मी पाहिला आहे. मला वाटतं चित्रपटाचा काही भाग चांगला होता. पण आमिरने यापेक्षा चांगली स्क्रिप्ट निवडायला हवी होती. खासकरून जेव्हा तो चार वर्षांनंतर चित्रपटांमध्ये परतत होता. मला संपूर्ण चित्रपट आवडला नाही, त्यातील काही भागच आवडला. लाल सिंग चड्ढामध्ये ‘वाह’ म्हणण्यासारखं काही नव्हतं.”

हे सुद्धा वाचा

फैजल आणि आमिर यांच्या नात्यात एकेकाळी खूप कटुता निर्माण झाली होती. फैजलने आमिरवर अनेक आरोप केले होते. इतकंच नव्हे तर आमिरच्या घरात मला बंदिस्त ठेवण्यात आलं होतं, असंही तो म्हणाला होता.

आमिरसोबत आता नातं कसं आहे असा प्रश्न विचारला असता फैजल म्हणाला, “आम्ही एकमेकांशी बोलतो. कधी कधी आम्ही दोघं भेटतो. पण तो त्याच्या आयुष्यात खूप व्यस्त आहे आणि मी माझ्या व्यस्त जीवनात संघर्ष करत आहे.”

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.