पलक नाज हिचे मोठे भाष्य, तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर भाऊ शीजान याची अवस्था…, सलमान खान याच्यासमोर थेट…

| Updated on: Jun 18, 2023 | 7:53 PM

तुनिशा शर्मा हिच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे तुनिशा शर्मा हिने आपल्या करिअरची सुरूवात ही बालकलाकार म्हणून केली होती. तुनिशा शर्मा निधनानंतर अनेक आरोप हे शीजान खान याच्यावर करण्यात आले. इतकेच नाही तर काही महिने जेलमध्ये शीजान खान हा होता.

पलक नाज हिचे मोठे भाष्य, तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर भाऊ शीजान याची अवस्था..., सलमान खान याच्यासमोर थेट...
Follow us on

मुंबई : फलक नाज हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. फलक नाज (Falaq Naaz)  ही नेहमीच चर्चेत असलेले नाव आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कुठेतरी फलक नाज हिची ही ओळख दूर झाल्याचे बघायला मिळाले. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर फलक नाज ही भाऊ शीजान खान याच्यासोबत खंबीरपणे उभे असल्याचे बघायला मिळाले. शीजान खान (Sheezan Khan) याची बहीण म्हणूनच फलक हिच्याकडे लोक सध्या बघत आहेत. नुकताच फलक नाज ही बिग बाॅस ओटीटी 2 (Bigg Boss Ott 2) मध्ये सहभागी झालीये. दुसरीकडे शीजान खान हा देखील खतरो के खिलाडीमध्ये सहभागी झाल्याचे बघायला मिळाले.

बिग बाॅस ओटीटीमध्ये फलक नाज हिला सोडण्यासाठी तिचे कुटुंबिय आले. यावेळी सलमान खान याला बोलत असताना फलक नाज हिने भाऊ शीजान खान आणि तुनिशा शर्मा यांच्याबद्दल अत्यंत मोठे भाष्य केले आहे. फलक नाज हिने तुनिशा शर्मा हिने आत्महत्या केल्यानंतर आयुष्यामध्ये नेमके काय घडत होते हे सांगितले आहे.

फलक नाज म्हणाली की, आजही मी आणि माझी आई रडतो. ती वेळच खूप जास्त वाईट होती. फलक पुढे म्हणाली की, तुनिशाच्या आत्महत्येचे खूप जास्त दु:ख झाले. तो जो काळ होता तो खूप जास्त क्रूर होता. जी व्यक्ती आमच्या अत्यंत जवळची गेली त्याचे नुकसान अनुभवण्याची साधी संधी देखील आम्हाला मिळाली नाही. खूप कठीण परिस्थिती होती.

फलक नाज आणि तुनिशा शर्मा या दोघी खूप जास्त चांगल्या मैत्रिणी होत्या. फलक नाज आणि तिची आई तुनिशा शर्मा हिच्या अंत्यसंस्कारला देखील पोहचल्या होत्या. फलक नाज हिने तुनिशा शर्मा हिच्या वाढदिवसाच्या दिवशी अत्यंत भावूक पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर केली होती. तुनिशा शर्मा हिच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना फलक नाज ही दिसली होती.

मुळात म्हणजे तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर फलक नाज हिचा भाऊ आणि टीव्ही अभिनेता शीजान खान याच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आले. तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात काही दिवस शीजान खान हा जेलमध्ये देखील होता. तुनिशा शर्मा हिच्या आईने शीजान याच्यावर गंभीर आरोप केले. तुनिशा शर्मा आणि शीजान हे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, तुनिशाने आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाले होते.