Parineeti – Raghav Wedding | परिणीती आज होणार नवरी; कुटुंबियांकडून मिळालं खास गिफ्ट

Parineeti - Raghav Wedding | परिणीती आणि राघव चड्ढा आज अडकणार विवाहबंधनात, लग्नापूर्वी कुटुंबियांनी दिलं खास गिफ्ट... विवाहासाठी चोप्रा आणि चड्ढा कुटुंबिया उदयपूर याठिकाणी दाखल... पण अभिनेत्री प्रियांका चोप्रा अद्याप नाही आली बहिणीच्या लग्नासाठी..

Parineeti - Raghav Wedding | परिणीती आज होणार नवरी; कुटुंबियांकडून मिळालं खास गिफ्ट
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 9:51 AM

मुंबई : 24 सप्टेंबर 2023 | बॉलिवूड आणि राजकारणात सध्या फक्त आणि फक्त अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर परिणीती आणि राघव यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रविवारी राघव आणि परिणीती विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. चाहते देखील परिणीती आणि राघव यांना पती – पत्नीच्या रुपात पाहण्यासाठी सज्ज झाले आहेत. शिवाय दोघांच्या लग्नाबद्दल देखील अनेक अपडेट आता समोर येत आहेत. दरम्यान, परिणीती चोप्रा हिलाला तिच्या लग्नानिमित्त तिच्या कुटुंबाकडून मिळालेल्या गिफ्टची माहिती समोर आली आहे.

राघव आणि परिणीती यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. परिणीती आणि राघव यांच्या लग्नात अनेक खास आणि हायप्रोफाईल पाहुणे उपस्थित आहेत. दोघांने अनेक भेटवस्तू दिल्याची माहिती देखील समोर येत आहे. कुटुंबीयांनी परिणीतीला काय गिफ्ट केले आहे, याची माहिती देखील समोर आली आहे.

परिणीती चोप्रा तिच्या लग्नाच्या निमित्ताने खूप उत्साही आणि आनंदी दिसत आहे. लग्नासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा अद्याप पोहोचली नसल्याची माहिती मिळत आहे. पण कुटुंबातील इतर लोक विवाहस्थळी उपस्थित आहे. परिणीती हिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या दिवशी कुटुंबियांनी परिणीती हिच्यासाठी खास दागिने भेट म्हणून आणले आहेत.. अशी माहिती समोर येत आहे.

परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा

परिणीती चोप्रा हिने १३ मे रोजी राघव चड्ढा यांच्यासोबत साखपुडा केला. तेव्हा अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यात देखील अनेक सेलिब्रिटी आणि दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. आता चाहते परिणीती आणि राघव यांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.

सांगायचं झालं तर गेल्या काही दिवसांपासून परिणीती तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी खासदार राघव चड्ढा आणि परिणीती यांना एका हॉटेलबाहेर स्पॉट करण्यात आलं. तेव्हापासून दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. आता दोघे विवाहबंधनात अडकणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.