आई – बहिणीवर गोळ्या झाडल्यानंतर वडिलांनी माझ्यासोबत…, अभिनेत्याने खंत व्यक्त करत सांगितलं सत्य
आई - बहिणीवर वडिलांनी गोळ्या झाडल्या, स्वतःच्या वाढदिवशी कुटुंबाचा अंत होताना मी..., अनेक वर्षांनंतर अखेर अभिनेत्याने सांगितली घडलेली धक्कादायक घटना... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या संटकाटांची सर्वत्र चर्चा रंगली आहे...
‘बेखुदी’, ‘बाली उमर को सलाम’ आणि ‘अंगारा’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत प्रसिद्धी झोतात आलेले अभिनेते कमल सदाना यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आता कमल सदाना बॉलिवूडपासून दूर असले तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. कमल सदाना यांच्या कुटुंबात अशी एक घटना घडली, जी विसरता येणं शक्य नाही. कमल सदाना यांच्या वाढदिवशी त्यांच्या वडिलांनी आई आणि बहिणीवर गोळ्या झाडल्या. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कमल सदाना यांनी तेव्हा घडलेली घटना सांगितली…
मुलाखतीत कमल सदाना म्हणाले, ‘प्रचंड वेदनादायी होतं…मी माझ्या डोळ्यांनी कुटुंबाला संपताना पाहिलं आहे. माझ्यावर देखील गोळी झाडण्यात आली होती. एक गोळी माझ्या मानेच्या एका बाजूला लागली होती आणि दुसऱ्या बाजूने बाहेर निघाली… तेव्हा माझे प्राण वाचले. माझ्या जिवंत असण्यामागे कोणतेही तार्किक कारण नाही. जणू काही गोळी प्रत्येक मज्जातंतूला चकवा देत पलीकडून बाहेर आली. मी कोणत्याही समस्येशिवाय जगलो. कोणतीही शारीरिक समस्या नाही.’
‘मला फक्त रक्त बंबाळ झालेल्या आई आणि बहिणीला रुग्णालयात न्यायचं होतं. दोघींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर कळलं की मला देखील गोळी लागली आहे. डॉक्टरांनी मला विचारलं, ‘तुझ्या शर्टवर रक्त कसलं आहे..’ मी डॉक्टरांना सांगितलं आईचं लागलं असेल…’
‘तेव्हा डॉक्टर मला म्हणाले तुला देखील गोळी लागली आहे… आमच्या आता तुला दाखल करुन घ्यायला जागा नाही, तू दुसऱ्या रुग्णालयात जा. माझ्या एका मित्राने मला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केलं… त्या घटनेतून मी बचावलो, पण माझ्या कुटुंबाचा अंत झाला. वडिलांनी दारुच्या नशेत आई आणि बहिणीची हत्या केली…’ असं देखील अभिनेते म्हणले.
पुढे कमल सदाना यांना विचारलं, तुम्ही आता वाढदिवस साजरा करता का? यावर उत्तर देत कमल सदाना म्हणाले, ‘सुरुवातील करत नव्हतो… आता देखील नाही कर. पण मित्र दरवर्षी केक घेऊन येतात. गेल्या वर्षी छोटी पार्टी ठेवण्यात आली होती. माझी दोन्ही मुलं पार्टीमध्ये होती. सर्वांना चांगलं वाटलं..’ एवढंत नाही तर, कमल सदाना पुढे म्हणाले, ‘अद्याप आम्ही त्याच घरात राहतो…’
‘जगात मी असा एकच व्यक्ती नाही, ज्याच्या आयुष्यात संकंट आली आहे. जगातील अनेकांच्या आयुष्यात अनेक संकटं आली असतील… पण आयुष्यात पुढे जाणं फार महत्त्वाचं असतं… मनात वैर ठेऊन आयुष्य जगता येत नाही… नाही तर तुम्ही कधीच आयुष्यात पुढे जाऊ शकत नाहीत…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कमल सदाना यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनेची चर्चा चाहत्यांमध्ये सुरु आहे.