Ankita Lokhande : प्रसिद्ध अभिनेत्याची अंकिता लोखंडेकडे शारीरिक सुखाची मागणी, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Ankita Lokhande : बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी प्रसिद्ध अभिनेत्याने केली होती अंकिता लोखंडे हिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी... अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने सोडलं मौन... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता लोखंडे हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा...

Ankita Lokhande : प्रसिद्ध अभिनेत्याची अंकिता लोखंडेकडे शारीरिक सुखाची मागणी, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 12:04 PM

मुंबई | 07 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने ‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे. पण टीव्ही विश्वातून सुरु केलेला प्रवास अंकिता हिच्यासाठी कठीण होता. कारण या प्रवासात अंकिता हिला असे अनेक जण भेटले ज्यांनी अभिनेत्रीकडे नको त्या गोष्टींची मागणी केली. खुद्द अंकिता हिने झगमगत्या विश्वात आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. वयाच्या 20 व्या वर्षी अंकिता हिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. त्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी देखील धक्कादायक गोष्टीचा सामना केला आहे.

अंकिता हिला एका साउथ सिनेमाच्या ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं होतं. ऑडिशनसाठी गेलेल्या अंकिता हिला कॉम्प्रोमाइज करण्यास सांगितलं होतं. अंकिता लोखंडे म्हणाली, ‘मी खूप सावध होती. त्या खोलीत मी एकटीच होता. तेव्हा माझं वय 19 ते 20 वर्ष असेल. मी त्यांना विचारलं, निर्मात्यांसोबत कोणत्या गोष्टीसाठी तडजोड करावी लागेल. त्यांना पार्टी किंवा डिनरसाठी जायचं आहे का?’

‘निर्मात्यांना कोणत्या गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज करायचं होतं मला कळलं होतं. पण मला त्यांच्या तोंडून ऐकायचं होतं. मी त्यांना म्हणाली, ‘तुमच्या दिग्दर्शकांना शारीरिक संबंधांसाठी मुलगी हवी आहे. काम करण्यासाठी त्यांनी एक उत्तम अभिनेत्री नकोय… असं बोलून मी तेथून निघून गेली. त्यानंतर त्यांनी माझी माफी देखील मागितली. पण त्यांना सिनेमासाठी स्पष्ट नकार दिला…’ असा धक्कादायक खुलासा अंकिता हिने केला.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्या घटनेवर देखील अंकिता म्हणाली, ‘पुन्हा सिनेमांमध्ये पदार्पण केल्यानंतर मला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. त्या अभिनेत्याने हात मिळवला. याठिकाणी मी त्या अभिनेत्याचं नाव घेणार नाही. कारण तो अभिनेता प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. तेव्हा देखील गोष्ट कॉम्प्रोमाइजवर येऊन थांबेल असं मला वाटलं होतं…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता हिने सांगितलेल्या धक्कादायक घटनांची चर्चा रंगली आहे.

अंकिता लोखंड टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. अंकिता कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.