प्रसिद्ध उद्योजकाची लेक, पण धुणी-भांडी करुन भागवायची भूक, आयुष्य होतं प्रचंड खडतर
Actress Life | उद्योजक वडिलांची गडगंज संपत्ती असताना 'ही' अभिनेत्री धुणी-भांडी करुन भागवायची भूक, वडिलांबद्दल सांगितलेलं 'ते' सत्य अत्यंत धक्कादायक... बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी खासगी आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे... सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...
झगमगत्या विश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अभिनय विश्वात येण्यापूर्वी दुसऱ्या क्षेत्रात काम केलं आहे. कोणी हॉटेलमध्ये काम करत होतं, तरी कोणी प्रायव्हेट जॉब… अशात कुटुंब झगमगत्या विश्वातील नसल्यामुळे कलाकारांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अशीच अभिनेत्री जीने भूक भागवण्यासाठी दुसऱ्यांच्या घरात धुणी-भांडी करण्याचं काम केलं. पण एक दिवस असा आला आणि अभिनेत्रीचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे, तुने तब्बल 6 दशक अभिनय विश्वात काम केलं आहे.
आजही अभिनेत्रीला चाहते विसरु शकलेले नाहीत. पण यशाच्या उच्च शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी अभिनेत्रीला अनेक वाईट प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. ज्या प्रसिद्ध अभिनेत्रीची चर्चा होत आहे, तिने 1945 साली ‘झीनत’ या सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि तिचे नाव शशिकल आहे. ‘झीनत’ सिनेमा आजच्या तरुण पिढीला माहिती देखील नसेल.
शशिकला यांनी अनेक सिनेमांमध्ये खोडकर मुलगी आणि व्हॅम्पायरच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. त्यानंतर त्या सहाय्यक भूमिकांमध्ये दिसल्या बहीण किंवा सासूची भूमिका त्यांनी केल्या. शशिकला तब्बल 69 वर्ष अभिनय विश्वात सक्रिय होत्या.
शशिकला यांनी तब्बल 100 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनय क्षेत्रात काम करत असताना शशिकला यांची ओळख प्रकाश सहगल यांच्यासोबत झाली. पहिल्या ओळखीचं कालांतराने प्रेमात रुपांतर झालं.
अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. शशिकला आणि प्रकाश सहगल यांना दोन मुली आहेत. शशिकला प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचल्या पण खासगी आयुष्यात त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. अभिनय विश्वात काम करण्यापूर्वी शशिकला दुसऱ्यांच्या घरी धुणी – भांडीचं काम करायच्या. वडील उद्योजक असताना देखील शशिकला यांनी धुणी – भांडी करण्याचं काम करावं लागत होतं. याचं कारण देखील शशिकला यांनी एक मुलाखतीत सांगितलं होतं.
शशिकला यांचे वडील प्रसिद्ध उद्योजक होते. पण त्यांचे वडील स्वतःची पूर्ण कमाई त्यांच्या लहान भावाला द्यायचे. अभिनेत्रीच्या वडिलांचे भाऊ लंडन याठिकाणी शिकत होते. शशिकला यांचे वडील फक्त त्यांच्या भावाला अधिक महत्त्व द्यायचे. एक वेळ अशी आली जेव्हा अभिनेत्रीच्या वडिलांना तोटा सहन करावा लागला… म्हणून स्वतःची आणि कुटुंबाची भूक भागवण्यासाठी अभिनेत्रीला धुणी – भांडी करावी लागली…
पुढे शशिकला म्हणाल्या होत्या, ज्या घरात त्या धुणी – भांडी करायच्या त्या घरात त्यांनी भेट अभिनेत्री नूरजहां यांच्यासोबत झाली. अखेर अभिनेत्री नूरजहां यांनी पतीला सत्य सांगितलं आणि शशिकला यांच्यासाठी अभिनय विश्वाचे दरवाजे उघडे झाले. त्यानंतर शशिकला यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. शशिकला यांचे निधन 4 एप्रिल 2021 मध्ये झालं. वयाच्या 88 व्या वर्षी शशिकला यांनी अखेरचा श्वास घेतला.