Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपयशानंतर अभिनेत्रीने स्वीकारला देह व्यापाराचा मार्ग; अंत अत्यंत धक्कादायक, निधनाने इंडस्ट्री हादरली

अभिनेत्रीच्या कठीण काळात सर्वांनी सोडली साथ, अपयशानंतर अभिनेत्रीने स्वीकारला देह व्यापाराचा मार्ग...शेवटच्या क्षणी अत्यंत गंभीर होती अभिनेत्रीची अवस्था... अखेरच्या क्षणी अभिनेत्रीला ओळखणं देखील झालं होतं कठीण...

अपयशानंतर अभिनेत्रीने स्वीकारला देह व्यापाराचा मार्ग; अंत अत्यंत धक्कादायक, निधनाने इंडस्ट्री हादरली
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 8:31 AM

मुंबई | 2 डिसेंबर 2023 : झगमत्या विश्वात कधी काय होईल सांगता येत नाही. लोकांनी भरभरुन प्रेम दिल्यानंतर अपयश कधी येईल सांगता येत नाही. असंच काही एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं. इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. एक काळ असा होता जेव्हा दिग्दर्शक, निर्माते अभिनेत्रीसोबत काम करण्यासाठी सतत प्रयत्न करायचे. पण अभिनेत्रीची लोकप्रियता कमी झाल्यानंतर कोणत्याच निर्माता, दिग्दर्शकाला धोका पत्कारायचा नव्हता.. अशात अभिनेत्र देह व्यापाराचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. अभिनेत्रीचा अंत मात्र फार भयानक होता. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहेत आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री निशा नूर आहे.

निशा नूर प्रामुख्याने तमिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये झळकली. तिने काही तेलुगू आणि कन्नड सिनेमांमध्ये देखील काम केले. पण तिच्या सौंदर्याची चर्चा जगभर पसरली होती. अनेक वर्ष मुख्य अभिनेत्री म्हणून सिनेमांमध्ये काम केल्यानंतर कालांतराने अभिनेत्रीची लोकप्रियता कमी झाली. काम मिळत नसल्यामुळे आयुष्यातील गरजा भागवण्यासाठी निशा हिने देह व्यापाराचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली.

देह व्यवसायात निशा नूर अडकली आणि इथूनच तिच्या आयुष्यातील वाईट टप्पा सुरू झाला. वेश्याव्यवसायाला सुरुवात केल्यामुळे निशा हिला अनेक संकाटांचा सामना करावा लागला. निशा हिची बदनामी तर झालीच, पण अभिनेत्री गंभीर आजाराचा देखील सामना कराला लागल. एड्ससारखा भयंकर आजार अभिनेत्रीला झाला…

हे सुद्धा वाचा

शेवटच्या क्षणी अभिनेत्रीसोबत कोणीही नव्हत. निशा नूर हिची अवस्था अत्यंत गंभीर झाली होती. शेवटच्या क्षणी दर्ग्याच्या बाहेर निशा अवस्थेत सापडली होती. तिची ओळख पटणं देखील कठीण झालं होतं. रिपोर्टनुसार, 2007 मध्ये प्रकृती अत्यंत गंभीर झालेल्या अभिनेत्रीच्या अंगावर किडे रेंगाळू लागले होते. तपसणी झाल्यानंतर अभिनेत्रीला एड्स झाल्याचं निष्पन्न झालं. आजारामुळे अभिनेत्रीचं 23 एप्रिल 2007 निधन झालं.

निशा नूर हिचं बालपण

निशा नूर हिच्या कुटुंबाची आर्थीक परिस्थिती देखील फार काही चांगली नव्हती. अशात घरातून पळून आलेल्या निशा नूर हिने अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पण तिला ठावूक नव्हतं इंडस्ट्रीमध्ये तिच्या आयुष्याचा अंत इतका वाईट होणार आहे. निशा हिने तिच्या हटके अदांना चाहत्यांच्या मनात राज्य निर्माण केलं. पण तिचा शेवट अत्यंत हृदयद्रावक होता.

राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट.
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.