Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्यांच्या दुकानात झाडू मारणारी ‘ही’ अभिनेत्री आज गडगंज संपत्तीची मालकीण

Actress Life : दुसऱ्यांच्या दुकानात झाडू - फरशी पुसण्याचं काम करणारी 'ही' अभिनेत्री आज कमावते कोट्यवधींची माया, प्रसिद्ध अभिनेता आयुष्यात आला आणि नशीब चमकलं

दुसऱ्यांच्या दुकानात झाडू मारणारी 'ही' अभिनेत्री आज गडगंज संपत्तीची मालकीण
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 2:49 PM

मुंबई | 18 डिसेंबर 2023 : झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी करियरच्या सुरुवातीला अनेक संकटांचा सामना केला. पण आयुष्यात आलेल्या अडचणींचा सामना करत अनेक सेलिब्रिटींनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती भारतातील नसली तरी, भारतात तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. तिने बॉलिवूडमध्ये काम देखील केलं आणि प्रसिद्धी मिळवली. उत्तम अभिनय आणि सौंदर्यामुळे अभिनेत्री चाहत्यांच्या मनात घर केलं. एवढंच नाही तर, अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केल्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.

सागंयचं झालं तर, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री माहिरा खान आहे. माहिरा हिला आता बॉलिवूडमध्या काम मिळणं बंद झालं आहे. पण भारतात तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पाकिस्तानात देखील माहिरा प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. माहिरा हिने अनेक सिनेमे, मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं, पण एक वेळ अशी होती जेव्हा अभिनेत्री दुसऱ्यांच्या दुकानात झाडू – फरशी पुसण्याचं काम करायची.

कॅलिफोर्निया याठिकाणी जेव्हा माहिरा तिचं शिक्षण पूर्ण करत होती, तेव्हा भूक आणि स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी अभिनेत्री एका दुकानात काम करत होती. अभिनेत्री दुकानाची साफ – सफाई करायची… पण आज माहिरा खान अफाट संपत्तीची मालकीण आहे. अभियन क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अभिनेत्रीने गंडगंज संपत्ती कमावली.

हे सुद्धा वाचा

माहिरा खान हिने बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानसोबत भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. शाहरुख खानसोबत रईस सिनेमात स्क्रिन शेअर केल्यानंतर अभिनेत्रीचं नशीब पूर्णपणे बदललं. रिपोर्टनुसार, माहिरा खान आज 10 – 20 कोटी नाही तर, तब्बल 107 कोटी रुपयांची मालकीण आहे.

माहिरा खान कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.