World Cup 2023 : वर्ल्ड कप सेमी फायनल जिंकल्यानंतर प्रत्येकाची लक्ष 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या फायनल सामन्याकडे लागलं आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना रंगणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भारत आणि ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या फायनल सामन्याची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर वर्ल्ड कप 2023 बद्दल आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. क्रिकेट वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये 28 वर्षीय गायिका परफॉम करणार आहे. अमेरिकेतील गायिका दुआ लिपा वर्ल्ड कप फायनलमध्ये परफॉम करणार आहे. म्हणून क्रिकेट वर्ल्ड कप 2023 ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अल्बेनियन वंशाची ब्रिटीश गायिका दुआ लिपा हिने मॉडेलिंग देखील केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायिका एका परफॉर्मन्ससाठी 5 ते 6 कोटी रुपये घेत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. दुआ लिपा फक्त तिच्या आवाजाने नाही तर, दिलखेच अदांनी देखील चाहत्यांना घायाळ करते.
वयाच्या 14 वर्षी दुआ लिपा हिने संगीत विश्वात पदार्पण केलं. दुआ लिपा यूट्यूबवर स्वतःची गाणी पोस्ट करायची. 2015 मध्ये, दुआ लिपा हिने वॉर्नर म्युझिक ग्रुपसोबत पहिला मोठा अल्बम लॉन्च करून संगीत विश्वात स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दुआ लिपा हिची चर्चा रंगत आहे.
2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या दुआ लिपा हिच्या सात गाण्यांच्या अल्बमने जगभरातील चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला. गायिकेने दोन ब्रिट पुरस्कार देखील जिंकले आहेत. शुन्यापासून सुरुवात केल्यानंतर दुआ लिपा हिने मागे वळून पाहिलं नाही. युट्यूबपासून सुरु झालेला दुआ लिपा हिचा प्रवास आता वर्ल्ड कप 2023 पर्यंत येऊन पोहोचला आहे.
दुआ लिपा हिच्या बद्दल सांगायचं झालं तर, गायिकेच्या चाहत्यांची संख्या जगभरात सर्वत्र फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील दुआ लिपा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी दुआ लिपा कायम स्वतःचे फोटो आणि गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. गायिकेच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.