दिवस रात्र नशेत असायची ‘या’ सुपरस्टारची मुलगी, सतत दारु, मित्र आणि…

| Updated on: Jan 06, 2024 | 2:47 PM

Actress Life : नशेमुळे उद्ध्वस्त झालं होतं 'या' सुपरस्टारच्या लेकीचं आयुष्य, ती स्वतः आहे प्रसिद्ध अभिनेत्री.... गेल्या 8 वर्षांपासून जगतेय असं आयुष्य, जाणून व्हाल हैराण... सध्या सर्वत्र सुपरस्टारच्या लेकीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

दिवस रात्र नशेत असायची या सुपरस्टारची मुलगी, सतत दारु, मित्र आणि...
Follow us on

मुंबई | 6 डिसेंबर 2024 : अभिनेत्री कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. पूर्वी अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल फार काही सांगत नव्हत्या. पण आता अभिनेत्री त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांना सांगत असतात. आता देखील एका सुपरस्टारच्या लेकीच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी समोर येत आहेत. सध्या ज्या सुपरस्टारच्या लेकीची चर्चा रंगत आहे. ती स्वतः एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेता कमल हासन आणि सारिका यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रृती हासन हिच्याबद्दल मोठी गोष्ट समोर आली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत श्रृती हिने तिला लागलेल्या नशेच्या सवयीबद्दल सांगितलं आहे.

मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘आता मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत आहे. गेल्या आठ वर्षांपासून मी दारुला हात देखील लावलेला नाही. पूर्वीपेक्षा आता माझं आयुष्य फार उत्तम झालं आहे. एक अशी वेळ आली होती जेव्हा संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटत होतं. मी कायम नशेत राहू लागली होती. मला कायम माझ्या ड्रींक करण्याची इच्छा असायची…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी स्वतःला पूर्णपणे बदललं आहे. आता मला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप होत नाही. आता सर्वकाही शांत आणि सुरळीत आहे. आयुष्यातील हा एक टप्पा असू शकतो आणि मला आता कायम असंच राहायला आवडेल…’ असं देखील श्रृती म्हणाली. एवढंच नाही तर, पार्टीत गेल्यानंतर आज देखील श्रृती हिला मित्र ड्रींक घेण्यासाठी आग्रह करतात. पण गेल्या आठ वर्षांपासून अभिनेत्रीने नशेकडे वळून पाहिलेलं नाही.

हे सुद्धा वाचा

श्रृती हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आता श्रृती अभिनेता प्रभास स्टारर ‘सालार’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रृती हिची चर्चा सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी श्रृती तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. रंगणाऱ्या सर्व चर्चा फक्त आणि फक्त अफवा असल्याचं देखील समोर आलं होतं. श्रृती सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.