मध्यरात्री बॉयफ्रेंडसोबत अभिनेत्री झाली इंटिमेट; लेकीच्या कृत्यावर आई-वडिलांकडून नाराजी
मध्यरात्री बॉयफ्रेंडसोबत लेकीला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर आई - वडिलांनी मोठा निर्णय घेण्याचा विचार केला, पण...; दुःख व्यक्त करत म्हणाले...; सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा... व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी साधला अभिनेत्रीवर निशाणा...
मुंबई : 6 नोव्हेंबर 2023 | सोशल मीडियावर अनेक असे व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजलेली असते. पण व्हायरल होणारे खळबळजनक व्हिडीओ सेलिब्रिटींचे असतील तर चाहत्यांमध्ये तुफान रंगलेली असते. आता देखील सोशल मीडियावर एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा बॉयफ्रेंडसोबत व्हिडीओ व्हायरल होत आहे. मध्यरात्री बॉयफ्रेंडसोबत इंटिमेट झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत. ज्यामुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागत आहे. एवढंच नाही तर आता अभिनेत्रच्या व्हायरल व्हिडीओवर तिच्या आई – वडिलांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
संबंधीत प्रकरणी अभिनेत्रीच्या खास मित्राने मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हायरल व्हिडीओची आणि आई – वडिलांना व्यक्त केलेल्या नाराजीची चर्चा रंगली आहे.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री ईशा मालवीय आहे. ‘बिग बॉस 17’ मध्ये ईशा आणि बॉयफ्रेंड समर्थ याच्यासोबत रंगलेला रोमान्स सध्या चर्चेत आहे. मध्यरात्री ईशा – समर्थ यांचा ‘बिग बॉस’च्या घरात रंगलेला रोमान्स वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान, ‘उडारिया’ मालिकेतील आणि ईशाच्या मित्राने यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
Nibba Nibbi Bigg Boss ko ab kuch aur hi show banate hue.@BeingSalmanKhan bhai ye aapka family show.pic.twitter.com/awppfnJqKo
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) November 4, 2023
ईशा हिचा सह-अभिनेता लोकेश बट्टा याने नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्रीच्या व्हिडीओवर मोठा खुलासा केला आहे. अभिनेता म्हणाला, ‘मी ईशा हिच्या आई – वडिलांच्या संपर्कात आहे. बिग बॉसच्या घरातील लेकीच्या वागणुकीमुळे ते प्रचंड दुःखी आहेत. मालिकेच्या शुटिंग दरम्यान आमची मैत्री घट्ट झाली होती. पण आम्ही कधीही एकमेकांना डेट केलं नाही.’
‘ईशा आणि मी सेटवर एकत्र जायचो. मी तिच्या घरी देखील जायचो.. तिच्या आईसोबत देखील माझे चांगले संबंध आहेत. पण आम्ही कधीही एकमेकांना डेट केलं नाही. पण अभिषेक याला आमची मैत्री बिलकूल मान्य नव्हती. पहिल्या दिवसापासून अभिषेक याला ईशा आवडायची. त्याने मला देखील ईशापासून लांब राहण्यासाठी सांगितलं होतं..’
अभिनेता पुढे म्हणाला, ‘माझं मालिकेतील पात्र संपलं आणि मी मुंबईत परतलो.. त्यानंतर ईशा आणि अभिषेक यांच्या नात्याची सुरुवात झाली. नुकताच ईशा हिच्या आईसोबत बोलणं झालं. बिग बॉसच्या घरातील ईशाची वागणूक तिच्या आई वडिलांना बिलकूल आवडत नाहीये. ईशा हिचे वडील सरकारी नोकरी करतात…’
‘ईशाचे आई-वडील तिला ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण करार असल्यामुळे शक्य होत नसल्याचं देखील ईशाची आई म्हणाली…’ सध्या सर्वत्र ईशा आणि समर्थ यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, ईशाचा एक्स-बॉयफ्रेंड अभिषेक याने देखील अभिनेत्रीच्या व्हिडीओवर नाराजी व्यक्त केली आहे.