अरमान मलिकच्या दोन पत्नी, हिंदू रितीरिवाजानुसार केले तिसरे लग्न, आठ वर्षाचा मुलगा, अखेर युट्यूबरने..
युट्यूबर अरमान मलिक हा कायमच चर्चेत असतो. विशेष म्हणजे आज अरमान मलिक हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. अरमान मलिक हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत दिसतोय. अरमान मलिकच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.
प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक हा कायमच चर्चेत असतो. अरमान मलिक हा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. बऱ्याचदा अरमान मलिक याच्यावर त्याच्या खाजगी आयुष्यामुळे जोरदार टीका होताना दिसते. अरमान मलिक याला दोन पत्नी असून चार मुले आहेत. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट न घेता अरमान मलिक याने दुसरे लग्न केले. हेच नाही तर अरमान मलिक याच्या दोन्ही पत्नी एकाच घरात राहतात. अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचे नाव पायल मलिक आहे. पायल मलिक हिला दोन मुले आणि एक मुलगी आहे. अरमान मलिकच्या दुसऱ्या पत्नीचे नाव कृतिका मलिक आहे आणि कृतिकाला एक मुलगा आहे.
अरमान मलिकची संपत्ती 100 ते 200 कोटी असल्याचे स्वत: त्यानेच सांगितले. अरमान मलिक हा लवकरच आता तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याची सातत्याने चर्चा होती. सध्या अरमान मलिक याच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. हेच नाही तर हिंदू रितीरिवाजानुसार लग्न होताना फोटोमध्ये दिसत आहे.
आता अरमान मलिक याचे तिसरे लग्न तर हिंदू रितीरिवाजानुसार झाल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र, अरमान मलिक याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो जरी सोशल मीडियावर व्हायरल होत असतील तरीही अरमान मलिक याने पहिल्याच पत्नासोबत दुसऱ्यांदा लग्न केले आणि त्याचेच हे व्हायरल होणारे फोटो आहेत.
अरमान मलिक आणि पायल मलिक यांचे लव्ह मॅरेज झाले होते. यानंतर त्यांनी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले. आता तेच फोटो व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये अरमान मलिक याची दुसरी पत्नी कृतिका मलिक ही देखील दिसत आहे. यासोबत शेजारी पायल मलिक आणि अरमान मलिक यांचा आठ वर्षांचा मुलगा देखील दिसत आहे.
अरमान मलिक तिसऱ्यांदा प्रेमात पडला असल्याचे मध्यंतरी सांगितले जात होते. मात्र, अरमान मलिक याने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हे स्पष्ट केले की, तो तिसऱ्यांदा प्रेमात पडला नाहीये आणि तो परत लग्न देखील करणार नाहीये. आपल्या कुटुंबासोबत आपण आनंदी असल्याचेही अरमान मलिक याच्याकडून स्पष्ट करण्यात आले. आपण तिसऱ्या लग्नाचा विचार देखील करू शकत नसल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले.