‘KGF Chapter 2 हिंदी व्हर्जनसाठी तू डबिंग का केलं नाहीस?’; श्रेयस तळपदेच्या उत्तराने जिंकली नेटकऱ्यांची मनं

बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम मोडणाऱ्या ‘केजीएफ: चाप्टर 2’ (KGF chapter 2) या चित्रपटाच्या हिंदी डबिंगची चांगलीच चर्चा झाली. गेल्या 14 वर्षांपासून आवाजाच्या दुनियेत संघर्ष करणाऱ्या सचिन गोळे (Sachin Gole) याने केजीएफ 2 मधील ‘रॉकी’ म्हणजेच यशचे संवाद हिंदीत डब केले आहेत.

'KGF Chapter 2 हिंदी व्हर्जनसाठी तू डबिंग का केलं नाहीस?'; श्रेयस तळपदेच्या उत्तराने जिंकली नेटकऱ्यांची मनं
Shreyas Talpade and YashImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 5:53 PM

बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम मोडणाऱ्या ‘केजीएफ: चाप्टर 2’ (KGF chapter 2) या चित्रपटाच्या हिंदी डबिंगची चांगलीच चर्चा झाली. गेल्या 14 वर्षांपासून आवाजाच्या दुनियेत संघर्ष करणाऱ्या सचिन गोळे (Sachin Gole) याने केजीएफ 2 मधील ‘रॉकी’ म्हणजेच यशचे संवाद हिंदीत डब केले आहेत. याआधी बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांपैकी ‘बाहुबली 2’मधील प्रभासला अभिनेता शरद केळकरने तर ‘पुष्पा’मधील अल्लू अर्जुनला अभिनेता श्रेयस तळपदेनं (Shreyas Talpade) आवाज दिला आहे. नुकतंच श्रेयसने इन्स्टाग्रामवरील लाइव्ह चॅटद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका नेटकऱ्याने त्याला केजीएफ 2 च्या डबिंगविषयी प्रश्न विचारला. त्यावर श्रेयसने दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. ‘पुष्पाच्या प्रचंड यशानंतर केजीएफ चाप्टर 2 साठी तू हिंदीत डबिंग का केलं नाहीस? त्या चित्रपटासाठी तू डबिंग करायला हवं होतंस’, असं एका चाहत्याने श्रेयसला विचारलं.

काय म्हणाला श्रेयस?

चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना श्रेयस म्हणाला, “मला असं वाटतं की ज्याने डबिंग केलं, ते नक्कीच अप्रतिम असेल. मी अजून चित्रपट पाहिला नाही पण मला खात्री आहे की ज्या कलाकाराने चित्रपटात काम केलंय, त्याने जबरदस्त काम केलं असेल. सर्व कलाकार ग्रेट आहेत.”

हे सुद्धा वाचा

‘केजीएफ 2’मध्ये यशला आवाज देणारा सचिन गोळे फारच क्वचित लोकांना माहित असेल. डबिंग इंडस्ट्रीत सचिन गेल्या 14 वर्षांपासून काम करतोय. 2008 मध्ये त्याने करिअरची सुरुवात केली. “मुंबईत मी अभिनेता होण्यासाठी आलो होतो. माझ्या कुटुंबीयांनीही माझी खूप साथ दिली. मात्र मुंबईत आल्यानंतर माझा खरा संघर्ष सुरू झाला. मला काम मिळत नव्हतं, राहायला पैसे नव्हते. अशातच माझा मित्र अनिल म्हात्रे याने माझी ओळख डबिंग विश्वाशी करून दिली. त्यांच्यासोबत मिळून मी नाटकासाठी काम करायचो. हळूहळू मला डबिंग इंडस्ट्रीतील बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. यादरम्यान मी बँकेतही नोकरी करत होतो. होम लोनच्या कामासाठी फिल्डवर जावं लागत होतं. मात्र मी फक्त हजेरी लावून साऊंड स्टुडिओमध्ये येऊन बसायचो”, असं सचिनने ‘अमर उजाला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

श्रेयसचा व्हिडीओ-

सचिन गोळेनं यशच्या आधीच्या चित्रपटांसाठीही हिंदी डबिंग केलं आहे. त्यामुळे केजीएफ 2 हा टर्निंग पॉईंट नसला तरी करिअरमधील महत्त्वपूर्ण टप्पा असल्याची भावना त्याने व्यक्त केली. केजीएफ 2ची इतरही डबिंग आर्टिस्ट्सचे ऑडिशन्स घेण्यात आले होते. मात्र यशला सचिनचा आवाज खूप आवडला. केजीएफ 2 मुळे संघर्षाचा 14 वर्षांचा वनवास संपल्याचं सचिन गोळेनं या मुलाखतीत म्हटलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.