Aishwarya Rai | बच्चन कुटुंबाने नाही तर, ‘या’ प्रसिद्ध सेलिब्रिटीने ऐश्वर्यासाठी घेतला पुढाकार !

'वेळ आली तर ऐश्वर्यासाठी लढायला देखील तयार आहे...'. 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटीने घेतला ऐश्वर्यासाठी पुढाकार... स्क्रिनशॉट पाहून व्हाल थक्क

Aishwarya Rai | बच्चन कुटुंबाने नाही तर, 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटीने ऐश्वर्यासाठी घेतला पुढाकार !
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 10:35 AM

मुंबई | बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. बच्चन कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. सध्या अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यामुळे बच्चन कुटुंब चर्चेत आलं आहे. ज्यामुळे अभिनेत्रीच्या सासू जया बच्चन यांच्यावर देखील निशाणा साधण्यात येत आहे. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा हिचा मुलगा अगस्त्या नंदा लवकरच झोया अख्तर यांच्या ‘द अर्चिस’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अशात अमिताभ बच्चन यांनी नातूच्या पहिल्या सिनेमाला सोशल मीडियावर प्रमोट केल्यामुळे चाहते भडकले आहे..

ऐश्वर्याच्या कोणत्याच सिनेमाचं प्रमोशन केलं नाही… असं म्हणत चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांची टीका केली आहे. एवढंच नाही तर, ‘जया यांच्यापेक्षा रेखा ऐश्वर्या हिच्यासाठी सासू म्हणून योग्य ठरल्या असत्या…’ असं देखील ऐश्वर्याचे चाहते म्हणाले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक रेखा यांचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये रेखा यांनी फक्त ऐश्वर्याचं कौतुक केलं आहे. रेखा म्हणाल्या, ‘ज्या मॉडेल्स मला प्रचंड आवडतात, त्यातील एक म्हणजे ऐश्वर्या… मी माध्यमांशी सहमत आहे ऐश्वर्या अगदी प्लास्टिक आहे.. मला ती फार आकर्षक वाटते.. गरज पडल्यास मी तिच्यासाठी एका वाघीणी सारखी लढेल.. स्वतःला सिद्ध करण्यासाठी ऐश्वर्याला कुठेही जायची गरज नाही..’

Rekha

रेखा पुढे म्हणाल्या, ‘कोण आहेत ते बाहेरचे लोक जे ऐश्वर्याच्या कौशल्याला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत? ती आपली तिजोरी आहे.. हिच वेळ आहे… आपल्याला तिला स्वीकारता आलं पाहिजे….’ रेखा यांचा जुना व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते नाराजी व्यक्त करत आहेत…

व्हिडीओवर कमेंट करत ऐश्वर्याचा एक चाहता म्हणाला, ‘जी गोष्ट बच्चन कुटुंबाने करायला हवी, ती गोष्ट रेखा करत आहेत… ऐश्वर्याच्या सासू म्हणून रेखा योग्य आहेत..’ तर दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ऐश्वर्यासाठी अशी सासू योग्य आहे..’ सध्या सर्वत्र बच्चन कुटुंब, ऐश्वर्या राय आणि रेखा यांची चर्चा रंगत आहे..

ऐश्वर्या राय बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी, ऐश्वर्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत अभिनेत्रीने स्क्रिन शेअर केली. ऐश्वर्याने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि हॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं..

बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना ऐश्वर्याने २००७ मध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं… दोघांना एक मुलगी देखील आहे. ऐश्वर्या – अभिषेक यांच्या मुलीचं नाव आराध्या असं आहे. आराध्या कायम तिच्या आई – वडिलांसोबत अनेक ठिकाणी दिसते. स्टारकिड म्हणून आराध्या लोकप्रिय आहे..

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.