Parineeti Chopra | परिणीती चोप्रा भडकली, अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहतेही हैराण
परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे आणि रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहे. परिणीती चोप्रा ही राघव चड्ढा यांच्यासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वीच परिणीती चोप्रा आणि राघव यांचा साखरपुडा हा पार पडला.
मुंबई : राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा शाही विवाहसोहळा राजस्थान येथील उदयपूर शहरात पार पडणार आहे. राघव चड्ढा (Raghav Chadha) आणि परिणीती चोप्रा यांच्या विवाहसोहळ्याची तयारी जोरदारपणे सुरू आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची पहिली भेट ही विदेशात झाली. काही दिवसांपूर्वीच हे मुंबईमध्ये स्पाॅट झाले.
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ बघायला मिळतंय. इतकेच नाही तर गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाबद्दलच्या प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांच्या नजरा दिसत आहेत. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा साखरपुडा दिल्ली येथे मोठे थाटात काही दिवसांपूर्वी पार पडला.
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे त्यांच्या लग्नामुळे चर्चेत असतानाच सध्या परिणीती चोप्रा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. मात्र, या व्हिडीओमध्ये परिणीती चोप्रा ही चांगलीच भडकताना दिसत आहे. परिणीती चोप्रा हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. परिणीती चोप्रा हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये परिणीती चोप्रा ही पापाराझी यांच्यावर भडकताना दिसत आहे. परिणीती चोप्रा म्हणाली की, मी तुम्हाला बोलावले नाहीये यार…मी तुम्हाला इथे येण्यास नाही सांगितले…असे म्हणत पापाराझी यांच्यावर भडकताना परिणीती चोप्रा ही दिसलीये. परिणीती चोप्रा हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय.
बऱ्याच लोकांना परिणीती चोप्रा हिचे हे वागणे अजिबातच आवडले नाहीये. अनेक जणांनी परिणीती चोप्रा हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, परिणीती चोप्रा हिचे हे चुकले आहे. दोन सेकंद थांबायला ऐवढे काय झाले हिला. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा देखील आली होती. आता लग्नासाठी देखील सहकुटुंब प्रियांका चोप्रा येणार असल्याची चर्चा आहे.