Sunil Grover | सुनील ग्रोवर याचा व्हिडीओ पाहून चाहते हैराण, कॉमेडियनने केले ‘हे’ काम, व्हिडीओ व्हायरल
सुनील ग्रोवर हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या व्हिडीओमुळे तूफान चर्चेत दिसत आहे. सुनील ग्रोवर याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. सुनील ग्रोवर हा नेहमीच सोशल मीडियावर खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो.
मुंबई : कॉमेडियन सुनील ग्रोवर (Sunil Grover) हा कायमच चर्चेत असतो. सुनील ग्रोवर हा आपल्या चाहत्यांना हसवताना कायमच दिसतो. चाहते हे सुनील ग्रोवर याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट बघत आहेत. विशेष म्हणजे सुनील ग्रोवर हा सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. चाहत्यांसाठी खास व्हिडीओ (Video) आणि फोटो शेअर करताना सुनील ग्रोवर हा दिसतो. सुनील ग्रोवर याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. सुनील ग्रोवर नेहमीच त्याच्या व्हिडीओमुळे चर्चेत असतो.
काही दिवसांपूर्वीच रस्त्याच्याकडेला असलेल्या गाड्यावर मक्याचे कणसे भाजताना सुनील ग्रोवर हा दिसला. सुनील ग्रोवर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. इतकेच नाही तर काही अनेकांना वाटले की, तो गाडा सुनील ग्रोवर याचाच आहे. मात्र, तो गाडा एका महिलेचा होता आणि व्हिडीओसाठी त्या गाड्यावर कनिस भाजत होता.
सध्या सोशल मीडियावर सुनील ग्रोवर याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सुनील ग्रोवर याचा हा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाल्याचे बघायला मिळाले. कधी मक्याचे कणिस भाजणे, कधी रस्त्याच्याकडेला बसून शेंगा विकणे ठिक होते. मात्र, आता तर सुनील ग्रोवर याने असे काही केले आहे की, त्याचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय.
View this post on Instagram
एका सलूनमध्ये चक्क एका व्यक्तीची कटिंग करताना सुनील ग्रोवर हा दिसत आहे. सुनील ग्रोवर याचा हा व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होताना दिसतोय. लोक सुनील ग्रोवर याच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. विशेष म्हणजे हे सलून अत्यंत साधे दिसत आहे. यावेळी पांढऱ्या रंगाच्या टि-शर्टवर सुनील ग्रोवर हा दिसतोय.
त्या व्यक्तीची कटिंग सुनील ग्रोवर हा अत्यंत मन लावून करताना दिसतोय. इतकेच नाही तर कटिंग करतानामध्येच सुनील ग्रोवर हा स्वत:चे केस व्यवस्थित करताना दिसतोय. सुनील ग्रोवर याच्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एका चाहत्याने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, सुनील ग्रोवर साहब, आता हे काय?
दुसऱ्याने लिहिले की, सुनील ग्रोवर आता हे काम बंद करा आणि कॉमेडी सुरू करा, आम्ही तुम्हाला खूप मिस करत आहोत. तिसऱ्याने लिहिले की, काहीही असो पण मला सुनील ग्रोवर यांचे हे व्हिडीओ जबरदस्त आवडतात. अजून एकाने लिहिले की, मलाही सुनील ग्रोवर यांच्याकडून कटिंग करून घ्यायची आहे. हाच व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होतोय.