Video | ‘बिग बॉस 17’ संपताच अंकिता आणि विकी यांचे लग्न मोडणार? चाहतेही हैराण, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
बिग बॉस 17 हे चांगलेच रंगात आल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालीये. मात्र, यांच्यामध्ये सर्वकाही अलबेल दिसत नाहीये.
मुंबई : नुकताच बिग बॉस 17 ची धमाकेदार सुरूवात नक्कीच झालीये. बिग बॉस 17 (Bigg Boss 17) चा पहिला विकेंडचा वार हा नुकताच झालाय. यावेळी सलमान खान हा घरातील सदस्यांचा जोरदार क्लास लावताना दिसला. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे ही पती विकी जैन (Vicky Jain) याच्यासोबत तर नील भट्ट हा पत्नी ऐश्वर्या शर्मासोबत सहभागी झालाय. यापूर्वीच्या सीजनला रूबिना दिलैक हिच्यासोबत तिचा पती अभिनव शुक्ला हा सहभागी झाला होता.
बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. बिग बॉस 17 ला अजून जास्त दिवस झालेले नसताना घरात मोठी धमाल होताना दिसतंय. घरातील स्पर्धेकांमध्ये मोठा वाद झाले. इतकेच नाही तर नील भट्ट आणि विकी जैन यांच्यामधील वाद इतका जास्त वाढला की, हे दोघे थेट एकमेकांच्या अंगावर जाताना दिसले.
सध्या बिग बॉस 17 चा एक प्रोमो व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे दिसत आहेत. यावेळी अंकिता लोखंडे ही विकीकडे तक्रार करताना दिसतंय. यावेळी अंकिता ही म्हणते की, मला वाटले तू माझी ताकद आहेस पण तू नाहीस. यावेळी विकी थेट म्हणतो की, मी दिवसभर तुझ्या मागेच फिरू का? मी हे नाही करू शकत.
View this post on Instagram
मी इथे नाक कट करायला आलो नाहीये. एक अत्यंत वाईट काळ आपल्यामध्ये आला होता हे तू मान्य कर. यावर अंकिता थेट म्हणते की, तू दरवेळी तोच विषयमध्ये का आणतोस? अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओवरून अनेकांनी थेट अंकिता लोखंडे हिला खडेबोल सुनावले आहेत.
एकाने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की अंकिता ही विकीला ब्लॅकमेल करते. दुसऱ्याने लिहिले की, ही अंकिता जशी दिसते तशी अजिबात नाहीये. तिसऱ्याने लिहिले की, स्वत: तर काहीच करत नाही, तो करत आहे तर त्याला करू देत नाहीये. एकाने लिहिले की, बिग बाॅसनंतर त्यांचे लग्न टिकेल की नाही याचा प्रश्न आहे.