प्रसिद्ध अभिनेत्रीवर जमावाची दगडफेक, थोडक्यात बचावली अभिनेत्री, काय आहे संपूर्ण प्रकरण

Actress Life : अभिनेत्रीची एक झलक पाहाण्यासाठी चाहत्यांची गर्दी, पण तिच्यावर जमावाची दगडफेक, पोलिसांमुळे बचावले अभिनेत्रीचे प्राण, काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून बसेल धक्का... सध्या सर्वत्र घडलेल्या प्रकरणाची चर्चा...

प्रसिद्ध अभिनेत्रीवर जमावाची दगडफेक, थोडक्यात बचावली अभिनेत्री, काय आहे संपूर्ण प्रकरण
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 12:00 PM

मुंबई | 18 जानेवारी 2024 : सेलिब्रिटींवर अनेकदा चाहत्यांमध्ये असताना हल्ले होत असतात. आता देखील एक प्रसिद्ध अभिनेत्रीवर एका कार्यक्रमासाठी जमलेल्या चाहत्यांनी दगडफेक केली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली. दगडफेक होताच पोलिसांनी अभिनेत्रीला सुखरुप वाचवलं आहे. पण नक्की काय झालं संपूर्ण प्रकरण जाणून घेऊ. ज्या अभिनेत्रीवर दगडफेक झाली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह आहे. औरंगाबादच्या दाऊदनगरमध्ये हल्ला झाला आहे. अभिनेत्रीवर हल्ला अन्य कोणी नाही तर, तिच्याच चाहत्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांमुळे अक्षरा या हल्ल्यातून थोडक्यात बचावली. पण अभिनेत्रीचा बचाव करत असताना एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. अक्षरा सिंगवर हल्ला का झाला आणि चाहते का संतापले याचं कारण देखील समोर आलं. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

अक्षरा बुधवार, 17 जानेवारी रोजी दुपारी एका शोरूमच्या उद्घाटनासाठी दाउदगर याठिकाणी पोहोचणार होती. पण धुकांमुळे अभिनेत्रीचा विमान ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी उशीर झाला. दुपारी कार्यक्रमासाठी पोहोचणारी अक्षरा संध्याकाळी पोहोचली. अशात अभिनेत्रीसोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती.

हे सुद्धा वाचा

अशाच लोकांना नियंत्रित करणं कठीण झालं. याचदरम्यान काही चाहते जखमी देखील झाले. हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या लोकांनी अक्षरा सिंगवर हल्ला केला. त्यांनी दगडफेक सुरू केली. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी अक्षराला घेरलं आणि तिला सुखरूप वाचवले. हाणामारीत अभिनेत्रीला काहीही झालेलं नाही.

पोलीस अधिकारी जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षरा हिला वाचवताना एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमी झालेल्या पोलिसांची प्रकृती आता स्थिर आहे. घडलेल्या घटनेनंतर  अभिनेत्री दाउदनगरहून परतली आहे.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अक्षरा सिंह हिची चर्चा सुरु आहे.

अक्षरा सिंह हिच्याबद्दल सांगायचं झआलं तर, अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अक्षरा भोडपुरी अभिनेत्री असली तरी, भारतात तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अक्षरा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.