‘ती चेटकिण, डायन…’ दिग्दर्शकाने केली श्रद्धा कपूरबद्दल अशी कमेंट; चाहते संतापले

श्रद्धा कपूरबद्दल एका दिग्दर्शकाने केलेली कमेंट चांगलीच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने श्रद्धासाठी जे काही शब्द वापरले त्याबद्दल तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर दिग्दर्शकावर प्रचंड टीका होताना दिसत आहे.

ती चेटकिण, डायन... दिग्दर्शकाने केली श्रद्धा कपूरबद्दल अशी कमेंट; चाहते संतापले
Fans furious with director Amar Kaushik for calling Shraddha Kapoor "chetkin"
Image Credit source: instagram
| Updated on: Apr 06, 2025 | 3:58 PM

बॉलिवूडमधील एक सुंदर आणि मराठी मुलगी म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं अशी अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. तिचा क्यूटनेस तसा सर्वांनाच आवडतो. पापाराझींची देखील श्रद्धा फेव्हरेट आहे. पण एका दिग्दर्शकाने जे काही तिच्याबदद्ल कमेंट केली ती ऐकून तिच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

‘स्त्री 2’ चा दिग्दर्शक श्रद्धाबद्दल काय बोलून गेला 

‘स्त्री 2’ चे दिग्दर्शक अमर कौशिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ चित्रपटातील कास्टिंगबद्दल अमर कौशिक बोलताना दिसत आहे. संभाषणादरम्यान त्याने असं म्हटलं आहे की, दिनेश विजनने त्याला सांगितले की श्रद्धा चेटकिणीसारखी हसते. व्हायरल व्हिडिओमध्ये अमर कौशिक एका मुलाखतीत श्रद्धाच्या कास्टिंगबद्दल म्हणाला की, “श्रद्धेच्या कास्टिंगचे श्रेय पूर्णपणे दिनेश विजानला जाते. त्याची आणि श्रद्धाची भेट एकदा एका विमान प्रवासादरम्यान झाली होती. एकाच फ्लाइटमध्ये असल्याने त्या प्रवासात त्यांच्यात काही गप्पा झाल्या त्यावरून त्याने मला सांगितले की, अमर ती स्त्री सारखी हसते. ती चेटकिणीसारखी हसते, माफ कर श्रद्धा. कदाचित त्याने असं काहीतरी म्हटलं असेल, मला आठवत नाही पण कदाचित तो तिला डायन वैगरे असंल असं काही म्हणाला होता वाटतं, म्हणून, जेव्हा मी श्रद्धाला भेटलो तेव्हा मी तिला आधी हसण्यास सांगितलं” असं तो या मुलाखतीत बोलताना दिसला आहे.

श्रद्धाच्या चाहत्यांना तिच्यावर केलेली कमेंट खटकली

अमरने हा किस्सा अगदी गंमतीत सांगितला असला तरी श्रद्धाच्या चाहत्यांना तो खटला. अमरने केलेली श्रद्धाबद्दलची ती कमेंट नक्कीच चाहत्यांना आवडली नाही. आता हा व्हिडीओ पाहून अभिनेत्रीचे चाहते चांगलेच संतापले आहेत. तसेच ते या व्हिडीओवर कंमेंट करून टिकाही करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच श्रद्धाच्या चाहत्यांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली. अमर कौशिकच्या या बोलण्याबद्दल ते रागावलेले दिसत आहेत.


चाहत्यांची दिग्दर्शकावर टीका

निर्मात्यावर टीका करताना एका युजरने म्हटलं आहे, “हा एक नवीन ट्रेंड आहे का जिथे त्यांच्याच चित्रपटातील पुरुष सार्वजनिक ठिकाणी त्यांचा अपमान करत आहेत? तुम्ही तुमच्या मुख्य अभिनेत्रीबद्दल असं कसं बोलू शकता? आधी त्याने तिच्या नावाने चित्रपटाचं प्रमोशन केलं, नंतर तिला बकवास बोलत आहे. श्रद्धाला चांगल्या टीम सदस्यांची आवश्यकता आहे!”, असं लिहून अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका केली आहे. दरम्यान, श्रद्धाचे चाहते ‘स्त्री’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाची तेवढ्याच आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि त्यांना तिसऱ्या भागातही श्रद्धाच हवी असल्याचं म्हटलं जातं. दरम्यान मॅडॉक फिल्म्सने घोषणा केली आहे की ‘स्त्री 3’ 13 ऑगस्ट 2027 रोजी प्रदर्शित होणार आहे.