Kangana Ranaut | कंगना राणावत हिने स्वत: लाच म्हटले थेट ‘बेवकूफ’, चाहत्यांना बसला धक्का, अभिनेत्रीला नेमके झाले तरी काय?

कंगना राणावत ही नेहमीच चर्चेत असते. बऱ्याच वेळा कंगना राणावत ही तिच्या विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात देखील अडकते. गेल्या काही दिवसांपासून कंगना राणावत ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून नेहमीच कोणत्याही विषयावर आपले म्हणणे मांडताना दिसते.

Kangana Ranaut | कंगना राणावत हिने स्वत: लाच म्हटले थेट 'बेवकूफ', चाहत्यांना बसला धक्का, अभिनेत्रीला नेमके झाले तरी काय?
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 4:58 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) ही नेहमीच चर्चेत असते. कायमच कंगना राणावत हिच्या निशाण्यावर बाॅलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री असतात. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडबद्दल मोठा खुलासा करत म्हटले होते की, मला एका कोपऱ्यात ढकलण्याचे काम हे बाॅलिवूडमध्ये (Bollywood) सुरू होते. मला चित्रपटामध्ये काम दिले जात नव्हते. एक घाणेरडे राजकारण हे बाॅलिवूडमध्ये सुरू होते. शेवटी या राजकारणाला कंटाळूनच मी थांबण्याचा निर्णय घेतला. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिच्या या विधानानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. यावेळी प्रियांका चोप्रा हिच्या सपोर्टमध्ये कंगना राणावत उतरली होती.

इतकेच नाही तर प्रियांका चोप्रा हिचा सपोर्ट करत कंगना राणावत हिने करण जोहर याला टार्गेट करत खडेबोल सुनावले होते. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर हा कंगना राणावत हिच्या निशाण्यावर होता. गेल्या काही दिवसांपासून कंगना राणावत ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. नुकताच तिने एक पोस्ट शेअर केलीये.

कंगना राणावत हिने शेअर केलेल्या पोस्टमुळे सध्या ती चर्चेत आहे. कंगना राणावत हिने ती पोस्ट तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलीये. या पोस्टमध्ये कंगना राणावत हिने स्वत: लाच बेवकूफ देखील म्हटले आहे. इतकेच नाही तर या पोस्टमध्ये कंगना राणावत हिने एयरपोर्ट लूकला कायमचा रामराम केला आहे.

इतकेच काय तर तिने थेट फॅशन इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे. कंगना राणावत हिने, सेलिब्रिटीज आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचे कपडे परिधान करतात आणि प्रचंड नफा मिळवतात अशा ट्रेंडवर टीका केली. कंगना राणावत हिने यावेळी असेही सांगितले आहे की, मोठ्या ब्रँड्सना प्रोत्साहन देण्याऐवजी भारतीय कुशल हस्तकला व्यावसायिकांनी बनवलेल्या स्वदेशी कपड्यांना प्रोत्साहन देणार आहे.

विशेष म्हणजे यासोबतच कंगना राणावत हिने एक फोटो देखील शेअर केले आहे जो 2018 मधील तिचा विमानतळावरील दिसत आहे. या फोटोला कंगनाने कॅप्शन दिले आहे की, ‘विमानतळाच्या लूकचा बेवकूफ ट्रेंड सुरू करण्यासाठी फक्त या व्यक्तीलाच जबाबदार धरले जाऊ शकते. आता कंगना राणावत हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. नेटकरी यावरून कंगनाला टार्गेट करताना दिसत आहेत.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.