Uorfi Javed | कुत्र्याने फाडले उर्फी जावेद हिचे कपडे? थेट फाटक्या कपड्यात अभिनेत्री, नेटकरी म्हणाले
उर्फी जावेद हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वादात अडकते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळत आहे. उर्फी जावेद हिच्यावर अनेकदा तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते.
मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने तिच्या खास स्टाईलने अगदी कमी कालावधीमध्ये एक ओळख नक्कीच मिळवली आहे. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरची (Career) सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. मात्र, उर्फीला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंगही बघायला मिळते. बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीमध्ये सहभागी झाल्यापासून परत उर्फी जावेद हिने मागे वळून बघितले नाहीये. उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या अतरंगी लूकमध्ये दिसते. बऱ्याच वेळा उर्फी जावेद हिला तिच्या अतरंगी कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याची धमक्या दिल्या जातात.
उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने अरमान मलिक आणि पायल मलिक यांच्या मुलांसाठी खास गिफ्ट पाठवले होते. उर्फी जावेद हिने अनेकदा पापाराझी यांना देखील स्मार्ट वाॅच गिफ्ट करताना दिसली. उर्फी जावेद हिच्यावर नेहमीच तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते.
नुकताच उर्फी जावेद हिचा नवा लूक पुढे आलाय. उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी जावेद ही काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत असून अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. मात्र, उर्फी जावेद हिने घातलेला तिचा ड्रेस हा अनेक ठिकाणी फाटलेला आहे. इतकेच नाही तर ड्रेसच्या चिंदया या जमिनीवर पडलेल्या दिसत आहेत.
View this post on Instagram
अनेकांना उर्फी जावेद हिचा हा लूक आवडलाय, तर दुसरीकडे उर्फी जावेद हिला तिच्या या लूकमुळे ट्रोल देखील केले जात आहे. एकाने व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, अरे या बिचारीला कोणीतरी कपडे द्या, हिचे कपडे संपल्यामुळे ही अंगाला चिंदया गुंडाळून आलीये. दुसऱ्याने थेट लिहिले की, गाडी वाला आया घर के कचरा निकाल, तिसऱ्याने लिहिले की, उर्फी खरे सांग कुत्रे मागे लागले होते ना? आणि कुत्र्यानेच हा ड्रेस फाटलाय ना?
तिसऱ्याने लिहिले की, हिच्याजवळचे आता सर्व कपडे संपले आहेत, त्यामुळे हिने आज असा ड्रेस घातला आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.