Tamannaah Bhatia | ‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती’; इंटिमेट सीनसाठी टॉपलेस झालेल्या तमन्ना भाटियावर टीकेचा भडीमार

अरुणिमा शर्मा दिग्दर्शित 'जी करदा' ही वेब सीरिज आठ भागांची आहे. या रोमँटिक ड्रामामध्ये तमन्नासोबतच सोहैल नायर, आशिम गुलाटी आणि अन्या सिंह यांच्याही भूमिका आहेत. ही सीरिज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे.

Tamannaah Bhatia | 'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती'; इंटिमेट सीनसाठी टॉपलेस झालेल्या तमन्ना भाटियावर टीकेचा भडीमार
Tamannaah BhatiaImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 1:12 PM

मुंबई : अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिने अभिनेता विजय वर्माविषयी जाहीर प्रेम व्यक्त केलं होतं. हे दोघं लवकरच ‘लस्ट स्टोरीज 2’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. इतकंच नव्हे तर विजयसाठी तिने तिचा 18 वर्षांपासूनचा ‘नो किसिंग नियम’सुद्धा मोडल्याचं म्हटलं जात आहे. यादरम्यान आता तमन्नाच्या आणखी एका वेब सीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. ‘जी करदा’ असं या सीरिजचं नाव असून यामधील बोल्ड सीन्समुळे तमन्नावर नाराजी व्यक्त केली जात आहे. ‘जी करदा’ या वेब सीरिजमध्ये तमन्नाने टॉपलेस सीन शूट केला आहे.

या सीरिजमधील काही सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये तमन्नाचे बोल्ड फोटो पहायला मिळत आहेत. मात्र तिला अशा रुपात पाहून नेटकऱ्यांना अजिबात आवडलं नाही. अनेकांनी तिला इंटिमेट सीन्साठी जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ‘तमन्नाकडे यावेळी असं काय कारण होतं, ज्यामुळे करिअरमध्ये पहिल्यांदा तिला असे सीन्स करावे लागले’, असा सवाल चाहत्यांनी केला आहे. ‘तमन्ना सध्या तिच्या करिअरच्या दुसऱ्या टप्प्यावर आहे, म्हणूनच ती असे सीन्स करतेय’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

अरुणिमा शर्मा दिग्दर्शित ‘जी करदा’ ही वेब सीरिज आठ भागांची आहे. या रोमँटिक ड्रामामध्ये तमन्नासोबतच सोहैल नायर, आशिम गुलाटी आणि अन्या सिंह यांच्याही भूमिका आहेत. ही सीरिज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे.

लस्ट स्टोरीज 2 मधील किसिंग सीनबद्दल तमन्ना म्हणाली,  “गेल्या 18 वर्षांत मी बऱ्याच ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ते चित्रपट हिट होण्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी मला कधीच इंटिमेट सीन किंवा किसिंग सीन करावे लागले नाही. लस्ट स्टोरीज 2 मध्ये फक्त कथेची गरज म्हणून मी तो सीन केला.”

“मला सुजॉय घोष यांच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा होती. करिअरमध्ये आतापर्यंत कधीच इंटिमेट सीन न करताही दिग्दर्शकांनी मला या भूमिकेसाठी निवडलं, याचं मला फार कौतुक वाटतंय. मोठ्या पडद्यावर मला रोमान्स करताना पाहून प्रेक्षकांना संकोचल्यासारखं वाटेल असं माझं मत होतं. त्यामुळे मी स्क्रीनवर कधीच किसिंग सीन न देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय प्रेक्षक हे गेल्या काही वर्षांत बरेच सुजाण झाले आहेत. बोटाच्या एका क्लिकवर त्यांना सगळी माहिती उपलब्ध असते. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून मला साचेबद्ध काम करायचं नव्हतं”, असंदेखील तिने स्पष्ट केलं होतं.

भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.
गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?
गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?.
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?.
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही.
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?.