Akshay Kumar | आयुष्यातील सर्वांत मोठी चूक म्हटलेल्या अक्षय कुमारने पुन्हा तेच केलं; भडकले चाहते

भविष्यात जाहिराती आणि प्रोजेक्ट्सची निवड करताना मी अधिक जाहीर जागरूक राहीन, या आपल्याच शब्दांचा विसर अभिनेता अक्षय कुमारला पडला आहे. चाहत्यांना आश्वासन दिल्यानंतरही त्याने पुन्हा एकदा पान मसाल्याची जाहिरात केली आहे. यावरून नेटकरी अक्षयवर चांगलेच भडकले आहेत.

Akshay Kumar | आयुष्यातील सर्वांत मोठी चूक म्हटलेल्या अक्षय कुमारने पुन्हा तेच केलं; भडकले चाहते
Akshay KumarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 1:19 PM

मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : आपल्या फिटनेससाठी ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमारने जेव्हा पान मसाल्याची जाहिरात केली होती,  तेव्हा चाहत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त झाली. या जाहिरातीमुळे अक्षयला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर चाहत्यांची नाराजी लक्षात घेत अक्षयने जाहीर माफी मागितली होती. इतकंच नव्हे तर त्याने जाहिरातीतून माघारसुद्धा घेतली होती. “ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती”, असं त्याने माफीनाम्यात म्हटलं होतं. मात्र त्यानंतर अक्षयने पुन्हा एकदा तीच चूक केली आहे. नुकतीच त्याने अभिनेता शाहरुख खान आणि अजय देवगणसोबत मिळून एक जाहिरात केली. ही जाहिरात एका तंबाखूजन्य पान मसाल्याची असल्याने पुन्हा एकदा तो ट्रॉलर्सच्या निशाणावर आला आहे.

जाहिरातीत नेमकं काय?

रविवारी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये शाहरुख, अजय आणि अक्षय कुमार हे तिघं मिळून एका तंबाखूजन्य पान मसाल्याची जाहिरात करताना दिसले. या तिघांसोबतच ‘बिग बॉस’ फेम सौंदर्या शर्मासुद्धा या जाहिरातीत दिसली. या व्हिडिओमध्ये शाहरुख आणि अजय एका कारमध्ये बसलेले असतात आणि कारच्या हॉर्नच्या आवाजाने अक्षय कुमारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. तर दुसरीकडे अक्षय हेडफोन लावून गाणी ऐकत असतो. त्यामुळे शाहरुख आणि अजय त्याची प्रतीक्षा करत असल्याचं त्याला कळत नाही. तो त्यांचे कॉलसुद्धा उचलत नाही. अखेर अजय एक पान मसाल्याचं पाकीट उघडतो आणि त्याच्या सुगंधाने अक्षयचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं जातं. जाहिरातीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अक्षय कुमारला खूप ट्रोल केलं जात आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@srkking555)

गेल्या वर्षी अक्षयचा माफीनामा

गेल्यावर्षी पान मसाल्याच्या जाहिरातीनंतर अक्षयवर खूप टीका झाली होती. या टीकेनंतर त्याने ट्विट करत चाहत्यांची जाहीर माफी मागितली होती. ‘मला माफ करा. मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि शुभचिंतकांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांपासून तुमच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रियांमुळे मी अस्वस्थ झालोय. मी तंबाखूचं समर्थन करत नाही आणि भविष्यात करणारही नाही. त्यामुळे मी या जाहिरातीतून माघार घेतो. त्यातून मिळालेलं मानधन मी चांगल्या कामासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. कायदेशीर पद्धतीनुसार ब्रँडकडून ती जाहिरात ठरलेल्या वेळेपर्यंत दाखवली जाईल. पण भविष्यात जाहिराती आणि प्रोजेक्ट्सची निवड करताना मी अधिक जाहीर जागरूक राहीन, याचं आश्वासन देतो,’ असं त्याने लिहिलं होतं. चाहत्यांना आश्वासन दिल्यानंतरही अक्षयने पुन्हा पानमसाल्याची जाहिराती केल्याने त्याच्यावर जोरदार टीका होत आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.