उर्फी जावेद हिचं टक्कल पाहून अनेक जण हैराण, का झालीये तिची अशी अवस्था?
Urfi Javed | मानसिक अस्वस्थता... उर्फी जावेद हिचं टक्कल पाहून अनेक जण हैराण, तिला नक्की झालंय तरी काय? फोटो तुफान व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्फी हिच्या फोटोची चर्चा... चाहते देखील कमेंट करत देत आहेत प्रतिक्रिया...
मॉडेल उर्फी जावेद कोणत्या सिनेमात, मालिकेत दिसत नाही, तरी उर्फी कायम चर्चेत असते. रोज वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत उर्फी लाईमलाईटमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असते. उर्फी हिला पाहण्यासाठी पापाराझींची देखील उर्फी भोवती गर्दी जमते. पण आता उर्फी तिच्या कपड्यांमुळे नाहीतर, नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. उर्फी हिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये उर्फीचं टक्कल दिसत आहे. उर्फीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन फोटो पोस्ट करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
उर्फी हिचं टक्कल पाहून अनेक जण हैराण झाले आहेत. पण उर्फी हिने टक्कल केलं नसून फिल्टरचा वापर केली आहे. पण ज्याने कोणी उर्फी हिचा फोटो एडिट केला आहे. त्याने फोटो योग्य प्रकारे एडिट केलेला नाही. कारण फोटोमध्ये उर्फी हिचे काही केस खांद्यापर्यंत दिसत आहेत. उर्फी हिने पोस्ट केलेल्या फोटोंवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. सध्या सर्वत्र उर्फी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
उर्फी हिच्या फोटोवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘फिल्टर लावलं आहे…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘फेक एडिटींग’, तिसरी नेटकरी म्हणाला, ‘टकली उर्फी’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘हा फक्त फिल्टर असावा अशी मी आशा करतो..’, ‘फिल्टर मागे केस दिसत आहेत…’ एवढंच नाहीतर, अनेकांनी उर्फीचा फोटो पाहिल्यानंतर कमेंटमध्ये मानसिक अस्वस्थता… असं देखील लिहिलं आहे.
उर्फी जावेद कायम तिच्या लूकमुळे चर्चेत असते. स्वचःच्या विचित्र फॅशनमुळे देखील अनेकदा उर्फी हिला वादग्रस्त परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील उर्फी हिला कायम ट्रोल केलं जातं. उर्फी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
उर्फी जावेद हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, उर्फी ‘लव सेक्स और धोखा 2 ‘ मध्ये दिसणार आहे. दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘लव सेक्स और धोखा 2’ मध्ये अभिनेत्री दिसणार आहे. सिनेमात उर्फी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. उर्फी हिच्या सीनबद्दल सांगायचं झालंतर, प्रेक्षकांना आवडेल अशा भूमिकेत उर्फी दिसणार आहे.
दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी म्हणाले, ‘मला उर्फी हिचा अंदाज आवडतो… ती समोर आव्हान देते. ती ज्या प्रकारे कपडे घालते, ती ज्या प्रकारे समोर येते… तिचा अंदाज मला आवडतो. सिनेमात उर्फी पाहुण्या कालाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. पण एक दिवस तिला मुख्य भूमिका मिळेल.. असं विश्वास देखील दिबाकर बॅनर्जी यांनी व्यक्त केला होता. सध्या सर्वत्र उर्फी हिची चर्चा रंगली आहे.