रजनीकांत यांच्या घरात मच्छर मारण्याची बॅट पाहून नेटकऱ्यांचे भन्नाट कमेंट्स

'कांतारा' फेम ऋषभने घेतली रजनीकांत यांची भेट; फोटोपेक्षा घरातील वस्तूंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

रजनीकांत यांच्या घरात मच्छर मारण्याची बॅट पाहून नेटकऱ्यांचे भन्नाट कमेंट्स
ऋषभ शेट्टीने घेतली रजनीकांत यांची भेटImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 30, 2022 | 2:19 PM

मुंबई- ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. टॉलिवूडपासून अगदी बॉलिवूडपर्यंतच्या कलाकारांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. यामध्ये ‘थलायवा’ रजनीकांत यांचाही समावेश होता. आता कांताराचा दिग्दर्शक आणि मुख्य भूमिका ऋषभ शेट्टी याने रजनीकांत यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दिसणारे रजनीकांत यांच्या घरातील काही वस्तू पाहून चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये ऋषभ आणि रजनीकांत हे एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. रजनीकांत यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यातील एका फोटोंमध्ये ऋषभने रजनीकांत यांच्या चरणांना स्पर्श करत त्यांचा आशीर्वाद घेतला. मात्र या सगळ्यात रजनीकांत यांच्या घरातील मच्छरच्या बॅटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं.

हे सुद्धा वाचा

सहसा मध्यमवर्गीय कुटुंबाचा एक भाग असलेला मच्छरचा बॅट रजनीकांत यांच्या घरात पाहून चाहत्यांना हसू अनावर झालं. ‘रजनी सर यांनासुद्धा मच्छर मारण्याची बॅट लागते हे पाहून बरं वाटलं. मला वाटलं होतं की त्यांच्या घरात मच्छर शिरण्याची हिंमत करू शकणार नाहीत’, असं एकाने लिहिलं. तर ‘फक्त मध्यमवर्गीयांपुरतं ही बॅट मर्यादित असते असा मला भ्रम होता, पण तो आज दूर झाला’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

काहींनी या फोटोंमधील ऋषभ शेट्टीच्या गळ्यातील सोन्याच्या चेनवरूनही कमेंट केली. ‘ऋषभच्या गळ्यातील चेन कदाचित रजनी सरांनी भेट म्हणून दिली असेल. कारण काही फोटोंमध्ये ती नव्हती आणि काही फोटोंमध्ये ती चेन दिसतेय’, असं निरीक्षण एका नेटकऱ्याने नोंदवलं.

रजनीकांत यांच्या भेटीचे फोटो पोस्ट करत ऋषभने ट्विटरवर लिहिलं, “तुम्ही आमची एकदा स्तुती केली तर आम्ही तुमची 100 वेळा स्तुती करू. धन्यवाद रजनीकांत सर, कांतारा या चित्रपटाचं कौतुक केल्याबद्दल आम्ही कायम तुमचे आभारी आहोत.”

‘माहीत असण्यापेक्षा माहीत नसलेलं अधिक महत्त्वाचं असतं. ‘कांतारा’ या चित्रपटात या गोष्टीची प्रचिती येते. या चित्रपटाने माझ्या अंगावर अक्षरश: काटा आणला. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते ऋषभ शेट्टी यांना माझा सलाम. भारतीय सिनेसृष्टीतील हा एक मास्टरपीस आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन’, असं ट्विट रजनीकांत यांनी केलं होतं.

याआधी प्रभास, अल्लू अर्जुन, कंगना रनौत, राम गोपाल वर्मा, विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित कांताराचं तोंडभरून कौतुक केलं. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.