कियाराचं आतापर्यंतचं सर्वात बोल्ड फोटोशूट, पाहून चाहत्यांना बसला धक्का
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कियारा अडवाणीने अतिशय बोल्ड फोटोशूट केले आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. कियाराची ही स्टाईल पूर्वी कधीच पाहायला मिळाली नाही. म्हणूनच तिचे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.
बॉलिवूड सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक कियारा अडवाणी हिने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकलीये. लोकांना तिची स्टाइलही आवडते आणि म्हणूनच ती तिच्या लूकवर खूप प्रयोग करत असते. आता कियाराचा नवा लूक समोर आला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ‘कॅट गर्ल’ लूक देऊन तिने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. कियाराने बॉडी सूट घालत फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये तिचा आत्तापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार दिसला आहे. तिने तिच्या किलर लूकने सगळ्यांच्या नजरा आकर्षित केल्या आहेत.
कियारा अडवाणीचा हा लूक रिलायन्सच्या पहिल्या ई-कॉमर्स ब्युटी प्लॅटफॉर्म Tira च्या मोहिमेसाठी होता. तिने निळा लेटेक्स बॉडी सूट परिधान केलाय. ज्यामध्ये तिची कर्वी फिगर दिसत आहे. या सूटमध्ये तिचा एकदम किलर लूक दिसत आहे.
हॉल्टर नेकलाइन असलेला हा बॉडी सूट बॅकलेस आहे. नेकलाइनच्या खाली कंबरेपर्यंत मोठा कट आहे. जो तिच्या लूकमध्ये ग्लॅम कोशिंट वाढवत आहे. तिने अतिशय स्किन फिट अटॅच पॅन्ट घातली आहे. या लेटेक्स बॉडी सूटमध्ये देखील चमक आहे. त्यामुळे कियाराचा लूक आणखीनच चमकत आहे.
कियाराने हा लूक अगदी सहजतेने कॅरी केला आहे. त्यामुळे तिला दुसरे अतिरिक्त काहीही प्रयत्न करावे लागले नाही. चांदीला सोन्याची जोड देऊन तिने हातावर बांगड्यासारखी स्टाईल केली आहे. त्यामुळे तिचा हा लूक आणखीनच हॉट झाला आहे.
View this post on Instagram
कियारा अडवाणीचा हा जबरदस्त लुक पूर्ण करण्यासाठी, कियाराने केस मोकळे सोडले आहेत. तिचा मेकअप हलका न्यूड शेडमध्ये ठेवला आहे. आयलायनरसह जाड काजल लावल्याने हसीनाचे डोळे सुंदर दिसत आहेत.
View this post on Instagram