Uorfi Javed | सुंदर दिसण्याच्या नादामध्ये उर्फी जावेद हिने लावली ओठांची वाट, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का, चक्क
उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद तिच्या फॅशनमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील सापडते. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा मुळीत अंदाजा बांधला जाऊ शकत नाही.
मुंबई : उर्फी जावेद हे नेहमीच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने अगदी कमी कालावधीमध्ये एक खास ओळख ही नक्कीच मिळवली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही उर्फी जावेद हिची बघायला मिळते. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. अनेक मालिकांमध्ये उर्फी जावेद ही महत्वाच्या भूमिकेत देखील होती. मात्र, उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीपासूनच (Bigg Boss OTT) मिळालीये. उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे टिका होते. मुळात म्हणजे उर्फी जावेद कधी काय घालेल याचा अजिबातच नेम नाहीये. अनेकदा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील मिळाल्या आहेत. कपड्यांमुळे नेहमीच उर्फी जावेद हिच्यावर टिका होते.
उर्फी जावेद ही नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये नेमके काय सुरू असते हे सांगताना दिसते. उर्फी जावेद ही चाहत्यांसाठी सतत खास व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो तूफान व्हायरल होताना देखील दिसतात.
नुकताच उर्फी जावेद हिने इंस्टा स्टोरीवर एक फोटो अपलोड केला आहे. उर्फी जावेद हिचा हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे ओठ खूप जास्त सुजल्याचे दिसत आहेत. उर्फी जावेद हिच्या ओठांना नेमके काय झाले हा प्रश्न अनेकांना पडलाय.
उर्फी जावेद हिने हा फोटो शेअर करत लिहिले की, तुम्हाला थोडे विचित्र वाटेल, परंतू मला सुजलेले ओठ आवडतात. काहीही विशेष नाही, फक्त फिलर्स पूर्ण केले आहे. उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा चेहरा दिसत नाहीये, यामध्ये फक्त उर्फी जावेद हिचे ओठ दिसत आहेत. आता उर्फी जावेद हिने शेअर केलेला हा फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
अनेकांनी उर्फी जावेद हिच्या फोटोवर कमेंट करत तिच्यावर टिका करण्यास सुरूवात केलीये. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. उर्फी जावेद हिच्या कपड्यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेशमध्ये महिलांनी थेट मोर्चा काढला होता.