बॉलिवूडचं आणखी एक कपल होणार विभक्त; लग्नाच्या १८ वर्षांनंतर घेणार घटस्फोट!
बॉलिवूडचं 'हे' कपल गेल्या एक वर्षापासून दूर; लग्नाच्या १८ वर्षांनंतर घेतला विभक्त होण्याचा निर्णय? प्रसिद्ध कपल विभक्त होत असल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का
मुंबई | 29 जुलै 2023 : बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी घटस्पोटाचा निर्णय घेतला. अरबाज खान – मलायका अरोरा, हृतिक रोशन – सुझान खान, सोहेल खान – सीमा सजदेह यांच्या घटस्फोटानंतर बॉलिवूडच्या आणखी एका सेलिब्रिटीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १८ वर्षांपासून एकत्र असलेल्या कपलने विभक्त व्हायचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या ज्या सेलिब्रिटी कपलच्या घटस्फोटाची चर्चा रंगत आहे, त्या कपलने एकेकाळी चाहत्यांना कपल गोल्स दिले होते. आता दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
अभिनेता फरदीन खान आणि पत्नी नताशा माधवानी यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. रिपोर्टनुसार, फरदीन आणि नताशा यांच्या खासगी आयु्ष्यात सतत वाद होत असल्यामुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगत आहे. अभिनेत्याची पत्नी नताशा हिने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे… असं देखील सांगण्यात येत आहे.
महत्त्वाचं म्हणजे दोघे गेल्या काही दिवसांपासून विभक्त राहत असल्याच्या चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगत आहेत. फरदीन आईसोबत मुंबई याठिकाणी तर नताशा लंडनमध्ये राहत आहे.. अशी माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरदीन आणि नताशा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या एक वर्षापासून दोघे एकत्र राहत नाहीत. अद्याप दोघांनी देखील रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. अभिनेत्याच्या पत्नीबद्दल सांगायचं झालं नताशा मुमताज यांची मुलगी आहे. अभिनेत्री मुमताज यांनी १९७४ मध्ये मयूर माधवानी यांच्यासोबत लग्न केलं. मुमताज आणि मयूर यांना दोन मुली आहेत. त्यांच्या दोन मुलींचं नाव तान्या आणि नताशा अशी आहेत.
२००५ मध्ये नताशा माधवानी आणि फरदीन खान यांनी लग्न केलं होतं. दोघांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. फरदीन दिवंगत अभिनेते फिरोज खान यांचे पूत्र आहेत. अभिनेता फरदीन सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
अभिनेता फरदीन याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘विस्फोट’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाची घोषणा झाल्यानतंर चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. अभिनेत्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत…