अभिनेत्रीसोबत जॅकेटने चेहरा लपवून पार्टीतून बाहेर पडला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता; व्हिडीओ व्हायरल

पापाराझींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये फरहान आणि अमृता हे जॅकेटने त्यांचा चेहरा लपवत पार्टीतून बाहेर पडताना दिसत आहेत. गेटमधून बाहेर पडल्यानंतर हे दोघं जॅकेटने आपला चेहरा झाकतात आणि तसंच कारच्या दिशेने चालू लागतात.

अभिनेत्रीसोबत जॅकेटने चेहरा लपवून पार्टीतून बाहेर पडला 'हा' प्रसिद्ध अभिनेता; व्हिडीओ व्हायरल
Farhan Akhtar and Amrita AroraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 2:02 PM

मुंबई: मलायका अरोराची बहीण आणि अभिनेत्री अमृता अरोरा हिने नुकताच आपला 45 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त अमृताची खास मैत्रीण करीना कपूर हिने तिच्या घरी मंगळवारी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यात अर्जुन कपूर, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, मलायका अरोरा, रितेश सिधवानी यांचा समावेश होता. पंजाबी पॉपस्टार एपी ढिल्लन यालासुद्धा अमृता अरोराच्या बर्थडे पार्टीमध्ये पाहिलं गेलं. या बर्थडे पार्टीतील बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र त्यापैकी फरहान आणि अमृताच्या एका व्हिडीओने खास नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

पापाराझींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये फरहान आणि अमृता हे जॅकेटने त्यांचा चेहरा लपवत पार्टीतून बाहेर पडताना दिसत आहेत. गेटमधून बाहेर पडल्यानंतर हे दोघं जॅकेटने आपला चेहरा झाकतात आणि तसंच कारच्या दिशेने चालू लागतात.

हे सुद्धा वाचा

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहेत आणि त्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. ‘असं कामच का करता ज्यामुळे तोंड लपवण्याची वेळ येते’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे दोघं मागच्या गेटनेही बाहेर पडू शकले असते. पुढच्याच गेटने चेहरा लपवून बाहेर पडण्याची काय गरज’, असाही सवाल दुसऱ्या युजरने केला. ‘इतका चेहरा लपवून काय उपयोग? आम्हाला कळालंच की’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

पहा व्हिडीओ-

अमृता अरोरा आणि करीना कपूर या दोघी एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. म्हणूनच मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त करीनाने तिच्या घरी खास सजावट करत पार्टीचं आयोजन केलं होतं. करीनाने फुगे आणि फुलांनी तिचं घर सजवलं होतं.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.