फरहानच्या लग्नाची होणार जंगी पार्टी; दिग्गज कलाकार लावणार उपस्थिती

शिवानी दांडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर फरहान खानने तिच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी त्याने शिवानी दांडेकरसोबत तो विवाहबंधनात अडकला आहे. त्यानंतर फरहानचे लग्न खूप साध्या पद्धतीने करण्यात आले. लग्नाला कोरोनामुळे काही मोजकेच सेलिब्रेटी हजर होते त्यामुळे आता त्याने जंगी पार्टीचे आयोजन केले आहे.

फरहानच्या लग्नाची होणार जंगी पार्टी; दिग्गज कलाकार लावणार उपस्थिती
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 8:50 PM

मुंबईः बॉलीवूडमधील फरहान अख्तर (Farhan Akhtar) या कलाकाराला ऑलराऊंडर आर्टिस्ट म्हणून ओळखले जाते. चित्रपट क्षेत्रात ज्या ज्यासाठी त्याने काम केले आहे, त्याचे त्याने सोने केले आहे. शिवानी दांडेकरसोबत (Shibani Dandekar) दीर्घकाळासाठी रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर फरहान खानने तिच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी त्याने शिवानी दांडेकरसोबत तो विवाहबंधनात अडकला आहे. फरहानचे लग्न खूप साध्या पद्धतीने झाले आहे. त्याच्या विवाहसमारंभासाठी त्याचे कुटुंबीय (Farhan Akhtar And Shibani Dandekar Wedding)आणि त्याच्याजवळचे काही दोस्त फक्त त्याच्या लग्नात सहभागी झाले होते. पण आता अशी बातमी येतेय की, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बॉलीवूडधील काही दिग्गजांसाठी त्याने जंगी पार्टीचे आयोजन केले आहे. फरहान अख्तरची ही पार्टी मुंबईमध्येच होणार असून त्यात चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार असणार आहेत.

सूरज की बाहों में गाण्यावर थिरकले

फरहान अख्तरच्या लग्नाची ही पार्टी मुंबईमध्येच होणार असून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या फार्म हाऊसवर आयोजित केलेल्या या विवाह समारंभामध्ये कोरोनाच्या प्रोटोकॉलमुळे काही सेलिब्रेटीनाच आमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळे या लग्नात फक्त 50 जणांनीच हजेरी लावली होती. फरहानच्या लग्नातील काही व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये फरहान अख्तर अगद चित्रपटात इंट्री घेतल्यासारखी घेतो आहे. तर जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातील सूरज की बाहों में या गाण्यावर तो येतो आहे तर शिवानी मॉर्डन नवरी बनून ती दिसत आहे. तर दुसरीकडे या लग्नात त्याचा जवळचा मित्र ऋतिक रोशनने फरहानबरोबर सेनोरिटा गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तर गीतकार आणि फरहानचे वडिल जावेद अख्तर यांनी या त्यांच्या मैत्रीवर एक कविताही सादर केली आहे.

दिग्गजांची मांदियाळी

या लग्नसमारंभात ऋतिक रोशन, राकेश रोशन, आशुतोष गोवारीकर, सतीश शहा, रिया, रितेश सिधवानी, मेयांग चांग यांच्याबरोबर अनेक दिग्गज या लग्नात सहभागी झाले होते. लग्नानंतर फरहान दीर्घ कालाखंडानंतर जी ले जरा या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह तो सगळ्यांच्या भेटीला येत आहे.

संबंधित बातम्या

‘हुनरबाज’चा आकाश सिंग बिहारमधून दीड हजार रुपये घेऊन आलेला ; आणि आता तो शर्यत जिंकलाच तर होणार…

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.