Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sofia Hayat: उपवासामुळे अभिनेत्रीची तब्येत बिघडली; बेशुद्ध झाल्याने रुग्णालयात केलं दाखल

सोफियाने 2016 मध्ये अध्यात्मचा मार्ग स्वीकारला. गेल्या काही दिवसांपासून ती शरीर शुद्ध करण्यासाठी उपवास (Fasting) करत होती. मात्र उपवासामुळे तिच्या शरीरात मिठाची (body salts) तीव्र कमतरता निर्माण झाली होती. ज्यामुळे ती बेशुद्ध झाली.

Sofia Hayat: उपवासामुळे अभिनेत्रीची तब्येत बिघडली; बेशुद्ध झाल्याने रुग्णालयात केलं दाखल
Sofia HayatImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 10:47 AM

‘बिग बॉस 7’मध्ये हजेरी लावल्यानंतर प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सोफिया हयातला (Sofia Hayat) युकेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोफियाने 2016 मध्ये अध्यात्मचा मार्ग स्वीकारला. गेल्या काही दिवसांपासून ती शरीर शुद्ध करण्यासाठी उपवास (Fasting) करत होती. मात्र उपवासामुळे तिच्या शरीरात मिठाची (body salts) तीव्र कमतरता निर्माण झाली होती. ज्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. सोफियाची प्रकृती सध्या ठीक आहे.

एका मीडिया पोर्टलशी बोलताना तिने सांगितलं की, ‘मी उपवासाच्या माध्यमातून शरीर शुद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. यासाठी मी अॅनेमा केला होता. पण या प्रक्रियेदरम्यान माझ्या शरीरातून बरंच मीठ आणि इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडले. त्यांची पातळी इतकी खालावली गेली की माझ्या जिवाला धोका निर्माण झाला. मी नर्सला मिठाची पाच पाकिटं देण्यास सांगितलं आणि त्यामुळे मी वाचले.”

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Sofia Hayat (@sofiahayat)

सोफिया पुढे म्हणाली की, “यामुळे मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. माझं हृदय जोरात धडधडत होतं, मी थरथर कापत होते. अखेर मला उपवास सोडावा लागला. माझ्या आरोग्यासाठी मला जेवावं लागलं. माझ्या शरीराल सध्या उपवास सहन होऊ शकणार नाही. यापूर्वी मी 2014 मध्येसुद्धा असं केलं होतं. पण तेव्हा मला काहीच झालं नव्हतं. आता माझी तब्येत खूपच बिघडली.” सोफियाला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

उपवास कशासाठी केला असा प्रश्न विचारला असता तिने सांगितलं, “माझ्या पूर्वीच्या आयुष्याचा शोध घेण्यासाठी, माझ्या आत्म्याशी संपर्क साधण्यासाठी आणि त्याच्याशी बोलण्यासाठी मी उपवास करत आहे. मी यापूर्वीही असा सराव केला आहे. पण काही दिवसांनी माझी अन्न खाण्याची किंवा पाणी पिण्याची इच्छा आपोआप कमी होते. पण यावेळी मला वेदना होत होत्या. अध्यात्मात एक चमत्कार आहे, ज्यामुळे मी आता बरी होत आहे. माझ्यावर देवाची कृपा आहे.”

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.