जेव्हा मी जगाचा निरोप घेईल…, ‘दंगल गर्ल’ फातिमा शेख का करतेय मृत्यूच्या गोष्टी?

Fatima Sana Shaikh | यशाच्या शिखरावर असताना 'दंगल गर्ल' फातिमा शेख म्हणाली, 'जेव्हा मी जगाचा निरोप घेईल...', असं का म्हणाली अभिनेत्री? अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते... पण आता असं का म्हणाली फातिमा शेख?

जेव्हा मी जगाचा निरोप घेईल..., 'दंगल गर्ल' फातिमा शेख का करतेय मृत्यूच्या गोष्टी?
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 8:15 AM

बॉलिवूड कलाकार कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पूर्ण कलाकारांसाठी रुपेरी पडद्यावर दिसणं फार महत्त्वाचं वाटत होतं. पण आता चित्र तसं राहिलेलं नाही. अनेक कलाकारांनी आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एवढंच नाही तर, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी टीव्ही विश्वासाठी देखील काम केलं आहे. दाक्षिणीत्य सिनेविश्वात देखील बॉलिवूडकरांचा बोलबाला आहे. पण दंगल गर्ल अभिनेत्री फातिमा शेख म्हणते, ती अधिक महत्वाकांक्षी नाही, पण अभिनेत्रीला असं काम करायचं आहे, जे कायम लोकांच्या लक्षात राहिल…

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम केल्याने नक्कीच सुरक्षित वाटतं, परंतु मला टीव्हीचे माध्यम देखील खूप आश्चर्यकारक वाटतं. मला असं वाटतं पूर्वी कलाकार विचार करायचे डिजिटल कटेंट आहे. येथील कटेंट टीव्हीवर नक्की येईल…पण आता कलाकार फक्त त्यांच्या भूमिकेचा विचार करतात. बदलत्या माध्यमांच्या काळात कलाकारांची प्रतिक्रिया बदलेली नाही..’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘कटेंट कोणत्याही माध्यमावर प्रदर्शित होणार असला तरी कलाकाराला त्याचं काम करायचंच आहे. जसं काम तो पूर्वीपासून करत आला आहे. मी पूर्वी फार महत्त्वाकांक्षी नव्हती आणि आताही नाही. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की मी जेव्हा या जगाचा निरोप घेईल तेव्हा माझ काम सर्वांच्या लक्षात राहिलं पाहिजे..’ असं अभिनेत्री तिची इच्छा देखील व्यक्त केली..

पुढे फातिमा हिला दाक्षिणीत्य सिनेविश्वात काम करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘संधी मिळाली तर मी दाक्षिणीत्य सिनेविश्वात देखील काम करेल…मी माझ्याबद्दल वाचलं होतं की मी एका मल्याळम सिमेमाचा रिमेक करत आहे, यामध्ये काहीही तथ्य नाही. जर मी दाक्षिणीत्य सिनेविश्वात पाऊल ठेवलं तर मी स्वतः सांगेल… ‘ असं देखील अभिनेत्री म्हणाली… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त फातिमा शेख हिची चर्चा रंगली आहे.

फातिमा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याामुळे चर्चेत असते. ‘दंगल’ सिनेमामुळे अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. फातिमा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

फातिमा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. सध्या सर्वत्र फातिमा हिची चर्चा सुरु आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.