Salman Khan यांच्यासोबत वाद ‘या’ भारतीय क्रिकेटरच्या मेहुण्याला पडले महागात; झालं मोठं नुकसान
Salman Khan | सर्वांसमोर सलमान खान याच्यासोबत भांडण, 'या' भारतीय क्रिकेटरच्या मेहुण्याला मोजावी लागली मोठी किंमत, नक्की काय आहे प्रकरण?... बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींसोबत सलमान खान याचे वाद आहेत. ज्यामुळे अनेक सेलिब्रिटींचं नुकसान देखील झालेलं आहे.
मुंबई : 20 सप्टेंबर 2023 | अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. वाद आणि सलमान खान हे नातं फार जूनं आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचं सलमान खान याच्यासोबत नातं चांगलं नाही. अनेक सेलिब्रिटींसोबत भाईजान याचे वाद आहेत. अशात बॉलिवूडमध्ये सलमान खान याचा दबदबा असल्यामुळे अनेक सेलिब्रिटींचं करियर उद्ध्वस्त झालं… अशा देखील अनेक चर्चा रंगल्या… दरम्यान भारतीय क्रिकेटरच्या मेहुण्याला देखील सलमान खान याच्यासोबत असलेले वाद महागात पडले आहेत… असं म्हणायला हरकत नाही… सध्या सर्वत्र सलमान खान आणि भारतीय क्रिकेटपटूच्या भांडणाची चर्चा रंगली आहे.. तर जाणून घेवू नक्की प्रकरण काय आहे…
अभिनेता सलमान खान फक्त त्याच्या सिनेमांमुळेच नाही तर, ‘बिग बॉस’ या शोमुळे देखील कायम चर्चेत असतो. आतापर्यंत सलमान खान याने ‘बिग बॉस’चे १६ सीझन होस्ट केले आहेत. शिवाय आता ‘बिग बॉस १७’ देखील लवरकच प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
‘बिग बॉस’च्या घरातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाद… ‘बिग बॉस’ शोच्या प्रत्येक सिझनमध्ये अनेक असे स्पर्धक होते, जे फक्त आणि फक्त भाडणांमुळे चर्चेत राहिले. ‘बिग बॉस ५’ मध्ये देखील असंच काही झालं होतं. भारतीय क्रिकेटर दीपक चहर याची पत्नी जया हिचा भाऊ सिद्धार्थ भारद्वाज ‘बिग बॉस ५’ मध्ये स्पर्धक म्हणून दाखल झाला होता.
‘बिग बॉस ५’ मध्ये सिद्धार्थ आणि सलमान खान यांच्यामध्ये वाद झाले होते. सिद्धार्थ आणि महक यांची भांडणं झाली होती. तेव्हा सलमान खान याने महक हिची बाजू घेतल्यामुळे वाद टोकाला पोहोचले होते. तेव्हा झालेल्या वादासाठी सिद्धार्थ याला मोठी किंमत मोजावी लागली.
‘बिग बॉस ५’ नंतर सिद्धार्थ भरद्वाज याला इंडस्ट्रीमध्ये काम मिळणं बंद झालं. सिद्धार्थ आता कॅफे मध्ये स्टँड अप कॉमेडी करताना दिसतो. काही दिवसांपू्र्वी सिद्धार्थने स्वतःचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला होता.. सिद्धार्थ एकेकाळी प्रसिद्धी झोतात आला होता. पण सलमान खान याच्यासोबत वैर अभिनेत्याला महागात पडलं आहे.
सलमान खान याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘टायगर ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान आणि त्याच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगत आहे.