OTT Debut | संजय लीला भन्साळी ‘इतिहासातून भविष्याकडे’, उचलणार मोठं पाऊल, रिचा चड्ढाला लॉटरी?

चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali)  यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला एकपेक्षा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट दिले आहेत.

OTT Debut | संजय लीला भन्साळी 'इतिहासातून भविष्याकडे', उचलणार मोठं पाऊल, रिचा चड्ढाला लॉटरी?
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 12:27 PM

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali)  यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला एकपेक्षा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. संजय लीला भन्साळी लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) आगमन करण्याच्या तयारीत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार संजय लीला भन्साळी एका वेब सीरिजवर काम करत आहेत, जी त्यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली तयार केली जाणार आहे.(Film director Sanjay Leela Bhansali will be coming to the OTT platform soon)

इतकेच नाही तर संजय लीला भन्साळी यांच्या डिजिटल डेब्यू प्रोजेक्टची मुख्य अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadda) असण्याची एक बातमीही समोर आली आहे. या वेब सीरीजमध्ये पीरियड ड्रामा असणार आहे. यासाठी संजय लीला भन्साळी आणि रिचा चड्ढा यांच्यात चर्चा सुरू आहे. सध्या या वेब सीरीजच्या स्क्रिप्टचे काम सुरू आहे. भन्साळीच्या या वेब सीरीजमध्ये काम करण्यासाठी रिचा उत्सुक असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या वेब सीरीजमध्ये दोन अभिनेते मुख्य भूमिकेत असणार आहेत मात्र, त्यांची नावे अद्यापपर्यंत समजू शकली नाहीत.

संजय लीला भन्साळीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या ते त्याचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी यामध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाईची भूमिका साकारत आहे. रिचाचा काही दिवसांपूर्वीच शकील हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यानंतर रिचा आता तिच्या आगामी चित्रपट ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच या चित्रपटाची दोन पोस्टर्स देखील प्रदर्शित झाले आहेत.

संजय लीला भन्साळी लाहोरच्या रेड लाईट एरिया हिरा मंडीवर एक चित्रपट लवकरच तयार करणार आहेत. पीपींगमूनच्या अहवालानुसार हिरा मंडी एक पीरियड ड्रामा वेब चित्रपट असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा वेब चित्रपट नेटफ्ल‍िक्सवर प्रदर्शित होणार आहे. 2021 च्या सुरुवातीला या चित्रपटाची अधिकृत घोषणा होईल. चित्रपटाचे शूटिंग 2021 च्या सुरूवातीलाच सुरू होऊ शकते.

संबंधित बातम्या : 

मिर्झापूर 2 मुळे अली फजलचा ‘भाव वाढला’, आता नव्या प्रोजेक्टसाठी घेतोय मोठं मानधन!

Tandav Trailer Out : सत्ता, राजकारण आणि षडयंत्र, सैफच्या ‘तांडव’चे ट्रेलर लॉन्च!

New Project | बाहुबलीच्या भल्लालदेवची ओटीटीवर धडाकेबाज एन्ट्री, ‘या’ सीरीजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

(Film director Sanjay Leela Bhansali will be coming to the OTT platform soon)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.