Wrap Up : ‘चंदीगड करे आशिकी’चं चित्रीकरण संपलं, वाणी आणि आयुष्मान खुरानानं केले फोटो शेअर
'चंदीगड करे आशिकी'चं चित्रीकरण संपलं. (Filming of 'Chandigarh Kare Aashiqui' is over, Vaani and Ayushman Khurana share photos)

मुंबई : अनलॉकमध्ये सर्व चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करुन, चित्रपट आणि मालिकांचं चित्रीकरण केलं जात आहे. आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर यांच्या ‘चंदीगड करे आशिकी’ या चित्रपटाचं चित्रीकरण कोरोना काळात सुरू झालं होतं आणि आता हे चित्रीकरण संपलं आहे. या चित्रपटाचं दोन महिन्यांपूर्वी चित्रीकरण सुरू करण्यात आलं होतं. ‘चंदीगड करे आशिकी’च्या चित्रीकरणानंतर वाणी कपूरनं फोटो शेअर केले आहेत.
‘चंदीगड करे आशिकी’चं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण टीमनं धमाल पार्टी केली आहे. वाणीनं पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत, या फोटोमध्ये वाणी, आयुष्मान आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर केक कापताना दिसत आहेत. वाणीनं ‘या चित्रपटाचं चित्रीकरण संपलं आहे, मी या टीमला खूप मिस करणार.’ असं कॅप्शन दित वाणीनं हे फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
आयुष्माननं चित्रीकरणाच्या सुरुवातीला वाणी कपूर आणि दिग्दर्शक अभिषेकसोबत एक फोटो शेअर केला होता. त्यानं फोटो शेअर करत, ‘नेक्स्ट स्टॉप- माझे होमटाउन चंदीगड.’ असं कॅप्शन दिलं होतं.
‘मी चंदीगडमध्ये प्रथमच शूटिंग करणार आहे. ही प्रक्रिया खूप खास असणार आहे आणि मी या अनुभवाच्या प्रत्येक सेकंदाचा आनंद घेईन. चंदीगड हे एक असं शहर आहे ज्यानं मला उत्तम अभिनेता होण्यासाठी पंख दिले. ‘ असं कॅप्शन देत त्यानं फोटो शेअर केले होते.
आयुष्मान लॉकडाऊन आधी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुलाबो सिताबो’मधे झळकला होता. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात आयुष्मान एका डॉक्टरच्या भूमिकेत झळकरणार आहे.
संबंधित बातम्या
Photo : ‘सौंदर्यांची खाण’ अभिनेत्री अमृता खानविलकर, पाहा फोटो