टिपू सुलतानवर नाही बनणार चित्रपट, सततच्या धमक्यांमुळे निर्मात्याने घेतला मोठा निर्णय, थेट म्हणाले, माझ्या कुटुंबावर…
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट हे मोठ्या वादात अडकताना दिसत आहेत. या वादाचा फटका हा थेट चित्रपटांना बसत आहे. लाल सिंह चढ्डा हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर सोशल मीडियावर विरोध केला गेला आणि हा चित्रपट थेट फ्लाॅप गेला.
मुंबई : नुकताच चित्रपट निर्माता संदीप सिंहने (Sandeep Singh) एक अत्यंत मोठी घोषणा केलीये. आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये बाॅलिवूडला अनेक हिट चित्रपट देणाऱ्या संदीप सिंह यांनी एक अतिशय मोठी घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट हे मोठ्या वादात सापडताना दिसत आहेत. इतकेच नाही तर या वादांचा फटका हा थेट चित्रपटाला बसत आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला अत्यंत बिग बजेटचा चित्रपट (Movie) आदिपुरूष हा वादात सापडला होता. मुळात म्हणजे आदिपुरूष चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर रिलीज झाल्यापासून वादाता तोंड फुटले. हा वाद चित्रपट रिलीज झाल्यानंतरही कमी झाला नाही. कोर्टाने देखील आदिपुरूष चित्रपटाच्या निर्मात्यांना फटकारे होते.
मिळणाऱ्या सततच्या धमक्यांमुळे आता चित्रपट निर्माता संदीप सिंहने मोठी घोषणा करत टीपू या चित्रपटावरील काम बंद करत असल्याचे जाहिर केले. संदीप सिंहने मे महिन्यामध्ये टीपू या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले होते. मुळात म्हणजे टीपू चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे जाहिर केल्यापासूनच संदीप सिंहला तूफान टार्गेट केले जात आहे.
टीपू हा चित्रपट टीपू सुलतानवर आधारित आहे. मात्र, जेंव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली तेंव्हापासूनच सतत संदीप सिंहला शिव्या आणि थेट जीवे मारण्याच्या धमक्या या मिळत आहेत. धक्कादायक म्हणजे फक्त संदीप सिंह यालाच नाही तर थेट त्याच्या कुटुंबियांना देखील शिव्या लोक देताना दिसताना दिसले.
View this post on Instagram
यासर्व गोष्टींनंतर आता संदीप सिंहने एक पाऊस मागे घेत चित्रपटावरील काम बंद केल्याचे जाहिर केले आहे. संदीप सिंहने सोशल मीडियावर एक खास पोस्ट देखील शेअर केलीये. संदीप सिंहने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले की, आता मला आणि माझ्या कुटुंबियांना शिव्या देणे बंद करा. कारण आता टीपू चित्रपटावरील काम बंद केले आहे.
हजरत टीपू सुलतानवर कोणताही चित्रपट मी तयार करणार नाहीये, असे संदीप सिंहने स्पष्ट केले आहे. अनवधानाने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो, असेही संदीप सिंहने म्हटले आहे. मी प्रत्येक धर्माचा आदर करण्यावर विश्वास ठेवतो. भारतीय म्हणून आपण एकत्र राहून एकमेकांचा आदर केला पाहिजे, असे पोस्टमध्ये संदीप सिंहने म्हटले.