Gadar 2 | ट्रेलरवरुन सॉलिड ‘गदर’, हँडपंप इज बॅक, ट्रेलर लाँच नंतर भन्नाट मीम्स व्हायरल
Gadar 2 | सनी देओल आणि 'गदर 2' चे चाहते सोशल मीडियावर सुसाट सुटले आहेत. ‘गदर 2’ चा ट्रेलर लाँच झाला असून रिलीजनंतर ट्रेंडिंगमध्ये आहे. ‘गदर 2’ चा ट्रेलर पाहून फॅन्स पुन्हा एकदा जुन्या काळात गेले आहेत.
मुंबई : बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘गदर 2’ सिनेमाचा ट्रेलर अखेर लाँच झाला आहे. मागच्या बऱ्याच महिन्यांपासून चित्रपटप्रेमींमध्ये ‘गदर 2’ सिनेमाची चर्चा आहे. पुन्हा एकदा तारा सिंह पाकिस्तानात जाऊन धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. तारा सिंह यावेळी सकीनासाठी नाही, तर आपल्या मुलासाठी पाकिस्तानात जाणार आहे. ‘गदर 2’ चा ट्रेलर लाँच झाला असून रिलीजनंतर ट्रेंडिंगमध्ये आहे. ‘गदर 2’ चा ट्रेलर पाहून फॅन्स पुन्हा एकदा जुन्या काळात गेले आहेत.
पुन्हा एकदा सनी देओलचा जुना जलवा पहायला मिळाला आहे. ट्रेलरमध्ये हँडपंपचा सीन पाहून चाहत्यांमध्ये एक वेगळा उत्साह संचारला आहे. मोठ्या पड्द्यावर पुन्हा एकदा तारा सिंहला हँडपंप मूळापासून उखडताना पहायच आहे.
त्या सीनवर शिट्टया वाजल्या. टाळ्यांचा कडकडाट
‘गदर 2’ चा ट्रेलर लाँच झाल्यानंतर सोशल मीडियावर हँडपंपबद्दल अनेक मजेदार मीम्स व्हायरल झाले आहेत. ट्रेलरच्या शेवटी, सनी देओल हँडपंपकडे रागाने पाहताना दिसतो. ट्रेलरमध्ये सनी देओलला हँडपंप मूळापासून उखडताना दाखवलेलं नाही. पण या सीनवर मोठ्या प्रमाणात शिट्टया वाजल्या. टाळ्यांचा कडकडाट झाला. एका पेजने हँडपंपवरुन मीम बनवला आहे.
Tara Singh ka intzaar krta hua handpump…#Gadar2Trailer #SunnyDeol #Ameshapatel #handpump pic.twitter.com/kSIkkimzDR
— habibi (@haso_na_yr) July 26, 2023
Billion dollar scene. #Gadar2Trailer आज तक इतना इंतज़ार किसी फ़िल्म का नहीं किया जितना गदर 2 का है…#hindustanzindabad pic.twitter.com/O9ivq7wsuT
— मोटिवेशनल पंक्तियाँ (@mpanktiya) July 26, 2023
फॅन्स खूप उत्साहित
अबीबी नावाच्या यूजरने फोटो शेयर केलाय. त्यात वाहत्या नदीजवळ एक हँडपंप दिसतो. हा हँडपंप तारासिंहची वाट पाहतोय, असं युजरने लिहिलं आहे. हँडपंप चित्रपटात पाहून फॅन्स खूप उत्साहित आहेत. काही युजर्स चित्रपटाचा ट्रेलर पाहून थोडे नाखुशही आहे. हा चित्रपट अजून चांगला होऊ शकला असता, असं त्यांच म्हणणं आहे.
#Gadar2Trailer :- Guys In The Trailer Have You Noticed This Scene …Thanks To Director @Anilsharma_dir Sir For Not Disclose This Scene …I think “* Jaise #SunnyDeol Ji Ne Nalke Ko Nihara Hai …”*Nalka Pakistan Se Fir India Aane Vala Hai”* ? #TaraSingh Is Back ..?? pic.twitter.com/BgdNIah1jX
— Anjul Sirohi Deols (@iamanjulsirohi) July 26, 2023
What a dialogue ?, Gadar 2 will take the box office by storm.#Gadar2 #Gadar2trailer #SunnyDeol #AmeeshaPatel #AnilSharma pic.twitter.com/ph4lQayAE8
— Sourabh Bari Jhunjhunwala (@thesourabhbari) July 26, 2023
पहिला गदर कधी प्रदर्शित झालेला?
22 वर्षांपूर्वी 2001 साली गदर चित्रपट प्रदर्शित झाला होता. अनिल शर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. सनी देओल, अमिषा पटेल, अमरीश पुरी, लिलेट दुबे यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. फाळणीवर आधारित हा चित्रपट होता. यात अमिषा पटेलने सकीना आणि सनी देओलने तारा सिंहच कॅरेक्टर रंगवलं होतं. अमरिश पुरी आणि सनी देओल यांच्या डायलॉगमुळे हा चित्रपट सिनेरसिकांच्या विशेष लक्षात राहिला.